Homeताज्या बातम्यामहात्मा जोतिबा फुले हायस्कूलमध्ये लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शूज वाटप

महात्मा जोतिबा फुले हायस्कूलमध्ये लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शूज वाटप

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :  महात्मा जोतिबा फुले हायस्कूल, शिरपूर येथे लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय शूज वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम उत्साहात संपन्न झाला. आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय जीवनात प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लीनेस क्लब, शिरपूरच्या अध्यक्षा श्रीमती राणी अग्रवाल या होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून ताईसो सीमाताई रंधे, विश्वस्त, कि. वि. प्र. संस्था, शिरपूर तसेच ताईसो संगीताताई देवरे, उपनगराध्यक्ष, शिरपूर-वरवाडे नगरपरिषद , डॉक्टर राखी अग्रवाल ,(Region chair person), तसेच लायन्स ग्रुपच्या सचिव डॉक्टर जय लक्ष्मी गिरासे, कोषाध्यक्ष श्रीमती पूजा अग्रवाल, श्रीमती अश्विनी गिरासे, श्रीमती प्रतिभा गायकवाड, श्रीमती ममता अग्रवाल, श्रीमती आशा पाटील, श्रीमती संगीता चव्हाण, श्रीमती श्वेता दायमा, ॲड. शालिनी सोनवणे, श्रीमती नंदा पाटील, श्रीमती अनिता पाटील, तसेच सद्गुरु फुटवेअरचे संचालक श्री अशोक शिरसाळे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शूज वाटप करून शिक्षणाबरोबरच सामाजिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत लीनेस क्लबचे मनःपूर्वक आभार मानले.

शाळेचे मुख्याध्यापक बापूसो एस. जे. कुवर सर यांनी लीनेस क्लबचे आभार मानत अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयीचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले. उपमुख्याध्यापक बापूसो के. डी. बच्छाव सर यांनीही विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेऊन उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन कुमावत सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र गोसावी सर यांनी प्रभावीपणे केले, तर रवींद्र बारी सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

याप्रसंगी लीनेस क्लबचे पदाधिकारी, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल लीनेस क्लब, शिरपूर यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरण विद्युत सुरक्षा सप्ताह स्पर्धेत वाजे विद्यालयाचे घवघवीत यश

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): महावितरणच्या विद्युत सुरक्षा सप्ताह २०२६ जनजागृती अभियानांतर्गत आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाजाचे लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाला अधिक वेग ; ७ ते १० जुलैदरम्यान ग्रामपंचायत स्तरावर विशेष...

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : प्रत्येक पात्र मतदाराने गणना प्रपत्र भरून देऊन लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आवाहन भारत...

खडकवासला धरण अपडेट : मुसळधार पावसानंतर पाणीसाठ्यात मोठी वाढ; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
पुणे | ७ जुलै २०२६: पुणे जिल्ह्यासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत...

प्राचार्य.डा.राख सर यांची बिड आकाशवाणी वर मुलाखत.

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): जगदंबा व जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ बी. फार्मसी, शिवाजीनगर गढी येथील प्राचार्य डॉ. महारूद राख यांची आकाशवाणी केंद्र बीडने...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक : विजयापेक्षा आत्मपरीक्षण महत्त्वाचे!

0
छत्रपती संभाजीनगर:(विशेष प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांकडून जल्लोष साजरा...

error: Content is protected !!