जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२६ मध्ये भारतीय संघाने सर्व पाच सुवर्णपदके पटकावत देशाचा गौरव उंचावला आहे. कोलंबियातील बुकारामांगा येथे झालेल्या या स्पर्धेत कनिष्क जैन, रिद्धेश अनंत बेंडाळे, ऋषित गर्ग, श्रेष्ठ सुरैय्या आणि स्वरित जोशी यांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेचा आणि अथक परिश्रमाचा ठसा उमटवला.
ही कामगिरी केवळ पदकांची नाही, तर भारतातील युवा प्रतिभा, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि संशोधनाची वाढती ओढ यांचा जागतिक स्तरावर झालेला गौरव आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उत्कृष्ट कामगिरी करत भारताची वैज्ञानिक ओळख अधिक भक्कम केली आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांना घडविणाऱ्या पालक, शिक्षक व मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन.






















