Homeताज्या बातम्यातलावात प्रकाश चमकण्याचे रहस्य उघड; अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस निरीक्षकांचे आवाहन

तलावात प्रकाश चमकण्याचे रहस्य उघड; अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस निरीक्षकांचे आवाहन

ब्रह्मपुरी:प्रतिनिधी ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा रूपाला मेंढा/आकापूर येथील गावालगत असलेल्या तलावामध्ये मागील तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळी पाण्यावर एक रहस्यमय प्रकाश चमचमताना दिसत होता. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि विविध चर्चांचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर, चंद्रपूर येथील ‘एसडीआरएफ’ पथकाने राबविलेल्या विशेष शोधमोहिमेत या रहस्याचा पर्दाफाश झाला असून, पाण्याखाली सुरू असलेला एक सामान्य एलईडी चार्जिंग बल्ब या सर्व गोंधळाचे कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे

रूपाला मेंढा परिसरातील तलावात अचानक प्रकाश चमकू लागल्याने गावकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आणि भीती पसरली होती. काही नागरिकांनी याकडे दैवी चमत्कार तर काहींनी मांत्रिक प्रकार किंवा गुप्तधन असल्याचा संशय व्यक्त केला. त्यातच काही स्थानिक वृत्तपत्रांनी घटनेची कोणतीही शहानिशा न करता थेट अंधश्रद्धा पसरवणाऱ्या आणि भीतीदायक बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे परिसरात अफवांचे पेव फुटले होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून ब्रह्मपुरी पोलिसांनी तातडीने चंद्रपूरच्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला एसडीआरएफ पाचारण केले. या पथकातील जवानांनी तलावाच्या पाण्यात उतरून सखोल शोधमोहीम राबवली. या दरम्यान जवानांना पाण्यात चालू स्थितीत असलेला एक ‘एलईडी चार्जिंग बल्ब’ सापडला, जो पाण्याखाली सतत ब्लिंक होत होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तलावात कोणताही चमत्कार नसून तो केवळ एक तांत्रिक बल्ब असल्याचे स्पष्ट झाले आणि अफवांना पूर्णविराम मिळाला. सध्या या परिसरात पूर्णपणे शांतता असून नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

कोणत्याही घटनेची सत्यता न तपासता अफवांवर विश्वास ठेवणे पूर्णपणे चुकीचे आहे. वृत्तपत्रांनी आणि माध्यमांनी समाजात अंधश्रद्धा पसरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पूर्ण शहानिशा करून जे सत्य आहे, तीच बातमी जनतेसमोर आणावी. नागरिकांनी कोणत्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये किंवा अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करू नये.”— प्रमोद बानबले पोलीस निरीक्षक, ब्रह्मपुरी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

गावागावांत रेल्वेचा रणशिंग; ९ ऑगस्टला गोंदे फाट्यावर इतिहास घडविण्याचा निर्धार!

0
सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; वकील संघ, SIMAसह विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा सिन्नर, दि. ६ ऑगस्ट: नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी...

दौंड शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भाजप महिला मोर्चाची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील मंजूर विकासकामे तातडीने सुरू करून अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी...

रक्षकांकडूनच भक्षकवृत्ती! पुणे लोहमार्ग मुख्यालयात महिला पोलिसांना रायफल व बांबूने अमानुष मारहाण

0
संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा; अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी स्वतः चौकशी करण्याची तीव्र मागणी पुणे (विशेष प्रतिनिधी):कायद्याचे रक्षण करण्याची आणि महिलांना सुरक्षा...

चंद्रपूर हादरले! ब्रम्हपुरी परिसरात इथेनॉल प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे चर्मरोगाचा उद्रेक; तब्बल १९८ बाधित.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) ब्रम्हपुरी परिसरातील इथेनॉल प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे स्थानिकांना त्वचारोग, अंगाला...

error: Content is protected !!