गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, व शहर व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणाऱ्या डॉ. प्रदीप व डॉ. प्रियंका राठोड यांच्या शारदा हॉस्पिटलच्या नव्या वास्तूचा स्थलांतर शुभारंभ तसेच ९ वा वर्धापन दिन आज गुरुवार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
नवीन बसस्टँडसमोर, गेवराई येथे उभारण्यात आलेल्या नव्या वास्तूमुळे परिसरातील नागरिकांना अधिक सुसज्ज आरोग्यसेवेचा लाभ मिळणार आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून शारदा हॉस्पिटलने गेवराई शहरासह तालुक्यातील आणि इतर ठिकाणच्याही रुग्णांना देखील वैद्यकीय सेवा देत आरोग्य क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. बदलत्या काळानुसार आरोग्यसेवेत आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्धता आणि आधुनिक उपचारपद्धती यांचा विस्तार
करण्याच्या उद्देशाने हॉस्पिटलचे नव्या वास्तूत स्थलांतर करण्यात येत आहे. स्त्रीरोग व प्रसूती, दंतचिकित्सा, शस्त्रक्रिया, आदी सेवा नागरिकांना मिळणार आहे. यामुळे लहान-मोठ्या आजारांसाठी रुग्णांना बाहेरच्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होऊन स्थानिक पातळीवरच तज्ज्ञ वैद्यकीय मार्गदर्शन व उपचार
मिळण्यास मदत होणार आहे. दरम्यान विविध तपासण्या आणि निदान सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असल्याने रुग्णांच्या उपचार प्रक्रियेला अधिक वेग व अचूकता मिळण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शारदा व अंकुशराव राठोड हे आई वडील असणार आहेत.
‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून वाटचाल..
गेवराईसारख्या ग्रामीण व निमशहरी भागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. गेल्या नऊ वर्षांत रुग्णांच्या विश्वासाला केंद्रस्थानी ठेवून सेवा देत असलेल्या शारदा हॉस्पिटलने आता नव्या वास्तूच्या माध्यमातून आपल्या आरोग्यसेवेचा विस्तार करण्याचे पाऊल टाकले आहे. “९ वर्षे विश्वास, सेवाभाव आणि उत्कृष्ट आरोग्यसेवेची गौरवशाली परंपरा” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला हा वर्धापन दिन व स्थलांतर शुभारंभ गेवराईच्या आरोग्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. नव्या वास्तूमध्ये उपलब्ध होणाऱ्या सुविधा आणि विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेमुळे गेवराईसह परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे





















