Homeताज्या बातम्यादहशतवादी कारवायांसाठी वापरलेली इमारत जप्त पुण्यात एनआयएची मोठी कारवाई.

दहशतवादी कारवायांसाठी वापरलेली इमारत जप्त पुण्यात एनआयएची मोठी कारवाई.

दहशतवादी कारवायांसाठी वापरलेली इमारत जप्त पुण्यात एनआयएची मोठी कारवाई…

पुणे : मुंबई-पुण्यासह गुजरातमधील महत्वाच्या शहरात बाँम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांनी पुण्यातील कोंढव्यातील बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले.

त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोंढव्यात दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत जप्त केली.

एनआयएने मोहम्मद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख, तलाह लियाकत खान, मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमिद खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ अदिल उर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), कादीर दस्तगिर पठाण उर्फ अब्दुल कादीर, समीब नासीरउद्दीन काझी (दोघे रा. कोंढवा, पुणे), जुल्फीकार अली बडोदवाला उर्फ लालाभाई उर्फ लाला उर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (तिघेही रा. पडघा, ठाणे) यांना अटक केली.

मोहम्मद आलमला कोथरूड परिसरात दुचाकी चोरताना पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना पकडण्यात आले होते. तपासासाठी मोहम्मदला कोंढव्यात नेण्यात आले होते. तेव्हा तो पसार झाला होता. २ नोव्हेंबर २०२३ रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला पकडले. त्यानंतर त्याला तपासासाठी एनआयएच्या ताब्यात देण्यात आले. दहशतवाद्यांनी सातारा जिल्ह्यातील एका वस्त्रदालनात दरोडा टाकून त्यांनी बॉम्बस्फोटाचे साहित्य खरेदी केले होते.

कोंढव्यात त्यांनी बाँम्ब कसा तयार करायचा याबाबतचे प्रशिक्षण घेतले होते. कोल्हापूर, सातारा परिसरातील जंगलात त्यांनी नियंत्रित पद्धतीने बाँम्बस्फोट केले होते. त्यांनी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानंतर एनआयएच्या पथकाने कोंढव्यातील मीठानगर परिसरातील इमारत जप्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खडकवासला धरण अपडेट : मुसळधार पावसानंतर पाणीसाठ्यात मोठी वाढ; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
पुणे | ७ जुलै २०२६: पुणे जिल्ह्यासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत...

प्राचार्य.डा.राख सर यांची बिड आकाशवाणी वर मुलाखत.

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): जगदंबा व जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ बी. फार्मसी, शिवाजीनगर गढी येथील प्राचार्य डॉ. महारूद राख यांची आकाशवाणी केंद्र बीडने...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक : विजयापेक्षा आत्मपरीक्षण महत्त्वाचे!

0
छत्रपती संभाजीनगर:(विशेष प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांकडून जल्लोष साजरा...

पांगरा येथील बनामाई गोशाळेला विहिप राष्ट्रीय प्रवक्त्याची सदिच्छा भेट

0
जिल्हा:(प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधवपातूर) तालुक्यातील पांगरा येथील बनामाई गोशाळा व गोविज्ञान अनुसंधान केंद्र येथे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकरजी गायकर तसेच विदर्भ प्रांत गोरक्षा...

जकार्तात मोदींचे भव्य स्वागत; इंडो-पॅसिफिक दौऱ्याची दमदार सुरुवात व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि महत्त्वपूर्ण खनिजांवर...

0
जकार्ता | वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तीन देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्याची सुरुवात इंडोनेशियातून केली. जकार्ता येथे पोहोचताच इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी...

error: Content is protected !!