Homeताज्या बातम्याघरात घुसून एका माजी पत्रकाराचा गोळ्या झाडून हत्या सदर पोलिस ठाण्यांतर्गत उडाली...

घरात घुसून एका माजी पत्रकाराचा गोळ्या झाडून हत्या सदर पोलिस ठाण्यांतर्गत उडाली खळबळ.

घरात घुसून एका माजी पत्रकाराचा गोळ्या झाडून हत्या सदर पोलिस ठाण्यांतर्गत उडाली खळबळ

नागपूर : दिवसाढवळ्या घरात घुसून एका माजी पत्रकाराचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना सदर पोलिस ठाण्यांतर्गत राजनगरात घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान उपराजधानीत खुनांची मालिका थांबत नसल्याचे चित्र असून मागील २४ दिवसातील हा १३ वा खून आहे.

विनय उर्फ बबलु पुणेकर (रा. राजनगर) असे खून झालेल्या माजी पत्रकाराचे नाव आहे. ते काही वर्षापूर्वी एका वृत्तपत्रात छायाचित्रकार म्हणून कार्यरत होते. सध्या ते दिनशॉ कंपनीत मार्केटींगमध्ये कार्यरत होते. पैशांच्या व्यवहारातून त्यांचा अनेकांसोबत वाद होत होता. या वादातून त्यांचा खून झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पुणेकर हे राजनगर येथील आपल्या घरी झोपले होते. एक युवक त्यांच्या घराचे गेट उघडून आत घुसला. त्याने पुणेकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना खून केला.

खुनानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर काही वेळातच पुणेकर यांचा खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. सदर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी सदर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक युवक पुणेकर यांच्या घरात शिरून थोड्याच वेळात लगबगीने बाहेर निघतानाचे दृष्य कैद झाले असून त्यानुसार पोलिस फुटेजमधील युवकाचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

error: Content is protected !!