Homeताज्या बातम्याशिवाजीनगर पोलीस स्टेशनची उत्तम कामगीरी ; उच्च शिक्षीत चोराने १७ मोबाईल चोरी...

शिवाजीनगर पोलीस स्टेशनची उत्तम कामगीरी ; उच्च शिक्षीत चोराने १७ मोबाईल चोरी करुन ते विक्री करण्यासाठी नामांकीत कंपनीचे मोबाईल बिलाचा दुरुपयोग करणाऱ्या चोरास केली अटक…

शिवाजीनगर पोलीस स्टेशनची उत्तम कामगीरी ; उच्च शिक्षीत चोराने १७ मोबाईल चोरी करुन ते विक्री करण्यासाठी नामांकीत कंपनीचे मोबाईल बिलाचा दुरुपयोग करणाऱ्या चोरास केली अटक…
पुणे ;- फिर्यादी हे शिवाजीनगर जुना तोफखाना भागातील त्यांचे स्वतःचे फर्निचरचे दुकानात दिनांक ०४/०१/२०२४ कामात व्यस्त असताना त्यांचा काउंटरवर ठेवलेला सॅमसंग कंपनीचा असलेला मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे तक्रारी वरुन शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि क्र.२०/२०२४ भादवि क. ३८० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांचे नेतृत्वाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दिमध्ये मोबाईल चोऱ्यांना प्रतिबंध करण्याकरीता व चोरीस गेलेले मोबाईल शोधण्याकरीता आदेश दिले होते. त्या अनुषंगाने चोरीला गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सपोनि बाजीराव नाईक व पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे आणि रुचिका जमदाडे यांनी शिवाजीनगर भागात सापळा लावुन त्यास ताब्यात घेवुन त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदरचा मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी हा ओंकार विनोद बत्तुल वय 22 वर्ष, रा. नाना पेठ पुणे येथील आहे आणि याचे शिक्षण – Bsc झाले आहे. त्याच्याकडे केलेल्या सखोल तपासामध्ये नामांकीत इलेक्ट्रॉनिक वस्तु विक्री करणाऱ्या कंपनीचे मोबाईलच्या मुळ बिलाच्या पीडीएफ मध्ये चोरी केलेल्या मोबाईलचे डिटेल्स एडिट करुन त्याची पीडीएफ तयार करुन तो चोरी केलेला मोबाईल स्वतःचा असल्याचे भासवुन मोबाईल दुकानदारास बनावट बिलाची पीडीएफ व स्वतःच्या आधार कार्डच्या आधारे विक्री केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, सदर गुन्ह्यात भादवि कलम ४६५,४६८,४७१ प्रमाणे वाढ करण्यात आली व त्यास नमुद गुन्ह्यात दि. १९/०४/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपीने नमुद गुन्ह्यातील विक्री केलेला मोबाईल व इतर अशा प्रकारे चोरी केलेले एकुण १७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेले इतर मोबाईल संदर्भात तपास चालु आहे.
तसेच पुणे शहर पोलीसांकडुन आवाहन करण्यात आले आहे कि, मोबाईल खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जुने वापरलेले मोबाईल खरेदी-विक्री करताना मोबाईल बिलाची पडताळणी करुन मगच व्यवहार करावे.
शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पदभार स्वीकारले आहे. आणि त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या मोठ्या कारवाईमुळे त्यांचे सर्व स्तरावरून गौरव करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, संदिपसिंह गिल्ल, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, वसंत कुंवर, सहा पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांचे नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, चलवादी, रुचिका जमदाडे यांनी केली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

महसूल खात्यात भ्रष्टाचाराचे जाळे? जनतेच्या विश्वासावर घाला; आता सर्वंकष चौकशीची वेळ!

0
  निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज राज्यातील सर्वसामान्य नागरिकाचा महसूल विभागाशी सर्वाधिक संबंध येतो. जमिनीची खरेदी-विक्री, सातबारा उतारा, फेरफार, वारस नोंद, मोजणी, सीमांकन,...

error: Content is protected !!