Homeताज्या बातम्यासौ.रजनीदेवी श्रीनिवास पाटील यांचे निधन ; आज सायंकाळी कराड येथे होणार अंत्यसंस्कार...

सौ.रजनीदेवी श्रीनिवास पाटील यांचे निधन ; आज सायंकाळी कराड येथे होणार अंत्यसंस्कार…

सौ.रजनीदेवी श्रीनिवास पाटील यांचे निधन ; आज सायंकाळी कराड येथे होणार अंत्यसंस्कार…

पुणे :- साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व सारंग पाटील यांच्या मातोश्री सौ.रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय 76) यांचे आज शुक्रवार दि. 12 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

सौ. रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होते.

आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सौ. रजनीदेवी पाटील यांचा 26 जुलै 1948 रोजी जन्म झाला. त्यांचे मूळ गाव सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील असून चार पिढ्यांची सैनिकी परंपरा असलेल्या बर्गे कुटूंबातील आहे. 13 मे 1968 साली कराड येथे सातारा जिल्ह्यातील व तालुक्यातील चिंचणेर वंदन हे मूळ गाव असलेल्या बर्गे या सैनिकी परंपरा असलेल्या कुटुंबातील लाडकी कन्या रजनीदेवी यांचा खा. श्रीनिवास पाटील यांच्याशी विवाह झाला.

खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रशासकीय,राजकिय व सामाजिक जीवनात त्यांनी कायम सोबत दिली. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी सहा वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रोत्साहन देणाऱ्या ‘भाई’ खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रत्येक कार्यामध्ये अतिशय हिरीरीने भाग घेऊन त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सौ.पाटील यांना सर्वजण ‘माई’ या नावाने ओळखत असत. आदर्श संस्कारित आणि एक धार्मिक गृहिणी म्हणून त्यांची ओळख होती. त्या उच्चशिक्षित असून देखील जुन्या रूढी परंपरा, संस्कृती जपण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. अत्यंत प्रेमळ स्वभाव आणि घरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाशी त्या अत्यंत आपुलकीने वागत असत. गेले काही दिवस त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

कराड-साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय 76) यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी सहा वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वृद्ध , दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी विशेष आधार सेवा शिबिर १३ व १४ जुलै...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)बीड ,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या...

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

error: Content is protected !!