Homeताज्या बातम्यालोकांना हेल्मेट घालण्यासाठी जागृत करत भावाने केला जम्मू ते कन्याकुमारी पर्यंत सायकल...

लोकांना हेल्मेट घालण्यासाठी जागृत करत भावाने केला जम्मू ते कन्याकुमारी पर्यंत सायकल प्रवास

लोकांना हेल्मेट घालण्यासाठी जागृत करत भावाने केला जम्मू ते कन्याकुमारी पर्यंत सायकल प्रवास…

पिंपरी : रस्ते अपघातामध्ये केवळ हेल्मेट घातले नाही म्हणून तरुणाला जीव गमवावा लागला. या अपघातानंतर त्याच्या चुलतभावाने हेल्मेट वापरासाठी जनजागृतीचा निश्चय करत जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत सायकल प्रवास सुरू केला.

हा तरुण नुकताच पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरून प्रवास करून हिंजवडी येथे आला होता. देवेश अग्रवाल असे त्याचे नाव असून, ४ जुलैपासून त्याने जम्मूपासून सायकलवर प्रवास सुरू केला.

देवेश याने सांगितले की, तो व्यवसायाने वाहनचालक आहे. खासगी वाहन चालवून तो कुटुंबाचा सांभाळ करतो. मात्र, अपघातामध्ये त्याच्या चुलत भावाला जीव गमवावा लागला. दुचाकीवरून जाताना त्याने हेल्मेट घातले नव्हते. त्याने हेल्मेट घातले असते तर अपघातामध्ये जीव वाचला असता. भावासारखे कित्येक जण केवळ हेल्मेट घातले नाही म्हणून अपघातात मृत्युमुखी पडत असतील, या विचाराने देवेश अस्वस्थ झाला. त्याने हेल्मेट वापरण्याच्या जनजागृतीसाठी सायकलवरून जम्मू ते कन्याकुमारी प्रवास करण्याचा निश्चय केला.

व्हिडीओ पाहून मिळाली प्रेरणा

यू-ट्यूूबवर ६५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने जम्मू ते कन्याकुमारी सायकल प्रवास केल्याचा व्हिडीओ देवेशने पाहिला. तो पाहून सायकलयात्रा करण्याची प्रेरणा मिळाली. ज्येष्ठ नागरिक करू शकतो तर मीही करू शकतो, हे देवेशने आई-वडिलांना पटवून दिले आणि प्रवासाची तयारी सुरू केली.

प्रवासाच्या नियोजनापेक्षा जागृतीला महत्त्व

देवेशने ठरावीक दिवसांमध्येच कन्याकुमारी गाठायचे असे ध्येय ठेवलेले नाही. प्रवास करत असताना जनजागृती करण्यावर त्याचा भर आहे. त्यामुळे ४ जुलैला निघून नुकताच पुण्यात पोहोचला. आता सातारा-कोल्हापूर मार्गे पुढे जात आहे. देवेश म्हणतो की, महाराष्ट्रातील लोक प्रेमळ आहेत. प्रेमाने चौकशी करतात. मदतीचा हात पुढे करतात.

घरची परिस्थिती हलाखीची आहे. मात्र, प्रवासाला निघालो तर लोक नक्कीच मदत करतील. आपला हेतू चांगला आहे, याची खात्री होती. त्याचा प्रत्यय प्रवासामध्ये येतो आहे. अनेक ठिकाणी लोक थांबवून मदतीचा हात देतात. जेवणाचे निमंत्रण देतात. फार कमी वेळा मला खिशातील पैसे खर्च करावे लागले. – देवेश अग्रवाल

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

मालेगावच्या कुकाणे येथील शाळेत २६ लाखांचा प्रवेश घोटाळा; मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

0
Times Of Maharashtra Desk : मालेगाव जि.नाशिक शिक्षणाच्या पवित्र मंदिरात पैशांची मोठी लूट सुरू असल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून समोर...

error: Content is protected !!