Homeताज्या बातम्याबाळासाहेब मनमानी करत होते शिंदे गटाच्या आमदारांच्या असे म्हणणे...

बाळासाहेब मनमानी करत होते शिंदे गटाच्या आमदारांच्या असे म्हणणे…

बाळासाहेब मनमानी करत होते शिंदे गटाच्या आमदारांच्या असे म्हणणे…

नागपूर : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबद्दल सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटातील काही आमदारांची उलटतपासणी झाल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांची उलटतपासणी सुरू आहे.

शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची उलटतपासणी झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने नागपुरात पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत.

शिंदे गटावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “सध्या आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुकांबाबत आरोप केले जात आहे. मात्र आमच्याकडे २००३, २००८, २०१३, २०१८ साली झालेल्या अशा सगळ्या निवडणुकांचे पुरावे आहेत. पण जे बाळासाहेबांवर श्रद्धा आहे, असं म्हणतात तेच लोक आरोप करत आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तसंच बाळासाहेबांवर असणाऱ्या गद्दारांच्या निष्ठा कशा उघड झाल्या आहेत, हे तुम्ही सांगा म्हणत अपात्रता सुनावणीत काय घडलं, याबाबत माहिती देण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे आमदार अनिल परब यांना दिली.

अनिल परब म्हणाले की, आज सकाळी जी सुनावणी झाली त्या सुनावणीदरम्यान उलटतपासणीवेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बाळासाहेबांबाबत जे उद्गार काढले, ते अतिशय संतापजनक होते. त्याचं कारण असं आहे की, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत, असं सांगून त्यांनी गद्दारी केली आहे. मात्र आता ते असं म्हणत आहेत की, बाळासाहेबांनी लोकशाहीची कोणतीही तत्त्वे कधीही पाळली नाहीत, बाळासाहेब मनमानी करत होते. बाळासाहेबांनी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही निवडणुका घेतल्या नाहीत, असे आरोप केसरकरांनी उलटतपासणीवेळी केले आहेत.

दरम्यान, “ज्यांचा बाळासाहेबांशी कधीही संबंध आला नाही, जे शिवसेनेत २०१४ साली आले. मात्र आता ते आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवत होते आणि आता साक्षीपुराव्यांच्या निमित्ताने त्यांचे खरे स्वरूप समोर आलं आहे. त्यांना बाळासाहेबांबद्दल कोणतंही प्रेम नसून ते स्वत:च्या स्वार्थासाठीच गेले होते, हे आता उघड झालं आहे, अशा शब्दांत अनिल परब यांनी शिंदे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

मालेगावच्या कुकाणे येथील शाळेत २६ लाखांचा प्रवेश घोटाळा; मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

0
Times Of Maharashtra Desk : मालेगाव जि.नाशिक शिक्षणाच्या पवित्र मंदिरात पैशांची मोठी लूट सुरू असल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून समोर...

error: Content is protected !!