Homeताज्या बातम्यापर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा दिला संदेश

पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा दिला संदेश

 जळगाव जिल्हा:(प्रतिनिधी)विनोद पवार

जळगाव : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) जळगाव शाखेतर्फे सनदी लेखापाल दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देणारे विविध उपक्रम उत्साहात पार पडले. जिल्हा उपनिबंधक कार्यालय परिसरात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान तसेच शहरातील प्रमुख मार्गांवर जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा उपनिबंधक कार्यालय परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता मोहिमेने झाली. या प्रसंगी ICAI जळगाव शाखेचे अध्यक्ष सीए रोशन रणवाळ, माजी अध्यक्ष सीए हितेश आगीवाल, माजी अध्यक्ष सीए अभिषेक कोठारी, वरिष्ठ सदस्य सीए आर. डी. जैन, तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. शाखेचे पदाधिकारी, व्यवस्थापन समिती सदस्य आणि सनदी लेखापालांनी परिसर स्वच्छ करून वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
यानंतर खानदेश सेंट्रल मॉल ते सीएम भवनदरम्यान जनजागृती पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत अध्यक्ष सीए रोशन रणवाळ, उपाध्यक्ष, विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष सीए सोहन नेहेते, कार्यकारिणी सदस्य सीए लक्ष्मीकांत लाहोटी, इतर सदस्य तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. पदयात्रेद्वारे स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जबाबदारीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष सीए रोशन रणवाळ यांनी सांगितले की, “सनदी लेखापाल दिनानिमित्त आयोजित सामाजिक उपक्रम समाजाशी नाते अधिक दृढ करणारे असून, प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवणे ही काळाची गरज आहे.
अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडण्यास निश्चितच मदत होते.”
दरवर्षी १ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या सनदी लेखापाल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांचे उपस्थितांनी स्वागत केले. पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकीची भावना जोपासण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जळगाव ICAI शाखेची व्यवस्थापन समिती, सर्व पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाला नवे वळण; ‘नोकरीसाठी पैसे’ रॅकेटची चौकशी, १२५ नियुक्त्या तपासाच्या...

0
अयोध्या : प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले असून, मंदिरातील नोकऱ्यांसाठी पैशांच्या मोबदल्यात नियुक्त्या झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त...

गोपाळवाडी रोडवरील नगरकर बंगला ते कुद्री बंगला रस्त्यावर पावसात डांबरीकरण? कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांचा सवाल

0
दौंड:(प्रतिनिधी) संघराज गायकवाड दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील नगरकर बंगला ते कुद्री बंगला या रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्याच्या काळात सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाची...

शरद पवार गटाचा खासदार भाजपच्या वाटेवर?’ते’ विधान करताच स्पष्ट केली भूमिका

0
Sharad Pawar NCP : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत ठाकरेंच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून फुटीर खासदारांवर मोठ्या...

रायगड जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

0
रायगड जिल्हा:( प्रतिनिधी) दिनेश चाफळकर भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ७...

अंडर-३० उद्योजकांचा भर उत्पादन विकासावर; उभारलेल्या निधीपैकी ५३% रक्कम विस्तारासाठी खर्च

0
नवी दिल्ली : भारतातील ३० वर्षांखालील (U30) युवा उद्योजक केवळ मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक उभारण्यातच आघाडीवर नसून, त्या निधीचा सुयोग्य वापर करून दीर्घकालीन व्यवसाय उभारण्यावर...

error: Content is protected !!