रायगड जिल्हा:( प्रतिनिधी) दिनेश चाफळकर
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ७ प्रमुख तालुक्यांमधील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उद्या, गुरुवार दिनांक २ जुलै २०२६ रोजी अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन ना. जावळे यांनी आज (१ जुलै) संध्याकाळी हा आदेश जारी केला.
*या ७ तालुक्यांमध्ये शाळा राहणार बंद:*
* अलिबाग
* पनवेल
* उरण
* श्रीवर्धन
* म्हसळा
* तळा
* पोलादपूर
हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ सदृश इशारा
हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार, रायगड जिल्ह्यामध्ये १ जुलै ते ५ जुलै २०२६ या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार, तर काही दुर्गम भागात अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, तळा आणि पोलादपूर या तालुक्यांमध्ये आज दिवसभर संततधार पाऊस सुरू असून, संभाव्य धोका आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन स्थानिक तहसीलदारांनी शाळांना सुट्टी देण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश
शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली, तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे कोणतीही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजात सहभागी व्हावे लागणार आहे.
प्रशासनाचे आवाहन
संबंधित तालुक्यांमधील सर्व माध्यमांच्या शाळांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा
RELATED ARTICLES
- Advertisment -
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाला नवे वळण; ‘नोकरीसाठी पैसे’ रॅकेटची चौकशी, १२५ नियुक्त्या तपासाच्या...
अयोध्या : प्रतिनिधी
अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले असून, मंदिरातील नोकऱ्यांसाठी पैशांच्या मोबदल्यात नियुक्त्या झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त...
गोपाळवाडी रोडवरील नगरकर बंगला ते कुद्री बंगला रस्त्यावर पावसात डांबरीकरण? कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांचा सवाल
दौंड:(प्रतिनिधी) संघराज गायकवाड
दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील नगरकर बंगला ते कुद्री बंगला या रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्याच्या काळात सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाची...
शरद पवार गटाचा खासदार भाजपच्या वाटेवर?’ते’ विधान करताच स्पष्ट केली भूमिका
Sharad Pawar NCP : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत ठाकरेंच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून फुटीर खासदारांवर मोठ्या...
पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा दिला संदेश
जळगाव जिल्हा:(प्रतिनिधी)विनोद पवार
जळगाव : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) जळगाव शाखेतर्फे सनदी लेखापाल दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश...
अंडर-३० उद्योजकांचा भर उत्पादन विकासावर; उभारलेल्या निधीपैकी ५३% रक्कम विस्तारासाठी खर्च
नवी दिल्ली : भारतातील ३० वर्षांखालील (U30) युवा उद्योजक केवळ मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक उभारण्यातच आघाडीवर नसून, त्या निधीचा सुयोग्य वापर करून दीर्घकालीन व्यवसाय उभारण्यावर...