Homeताज्या बातम्यादौंड शहरात प्लास्टिक बंदी कागदावरच? खुल्या विक्रीकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप

दौंड शहरात प्लास्टिक बंदी कागदावरच? खुल्या विक्रीकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): राज्य शासनाने प्लास्टिक बंदी लागू करून अनेक वर्षे उलटली असली तरी दौंड शहरात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व इतर साहित्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे शहरात सर्रास प्लास्टिकचा वापर होत असताना नगरपालिका प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
शहरातील किराणा दुकाने, भाजी मार्केट, फळ विक्रेते, हॉटेल्स तसेच विविध व्यावसायिकांकडून ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिकचा साठा आणि वापर सुरू असूनही संबंधित यंत्रणा कारवाई करत नसल्यामुळे प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
प्लास्टिकमुळे नाले तुंबणे, कचऱ्याचे प्रमाण वाढणे, जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होणे आणि पर्यावरणाचे नुकसान होणे यासारख्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. शासनाने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर नियम लागू केले असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.
नागरिकांचा प्रश्न आहे की, शहरात उघडपणे प्लास्टिकची विक्री होत असताना नगरपालिका प्रशासनाला याची माहिती नाही का? आणि माहिती असल्यास संबंधित विक्रेते व पुरवठादारांवर कारवाई का केली जात नाही?
दौंड शहरातील पर्यावरणप्रेमी व जागरूक नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाने विशेष मोहीम राबवून बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री व वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!