Homeताज्या बातम्याST Bus : हिंगोली भरदिवसा राडा! तिकीट मागितले म्हणून एसटी वाहकाला बेदम...

ST Bus : हिंगोली भरदिवसा राडा! तिकीट मागितले म्हणून एसटी वाहकाला बेदम मारहाण, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

हिंगोली: मध्यवर्ती बस स्थानकावर एका एसटी बस वाहकाला (कंडक्टर) प्रवाशांच्या टोळक्याने तिकिटाच्या कारणावरून गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

संजय अडकिने असे या मारहाणीत जखमी झालेल्या एसटी वाहकाचे नाव आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंगोली आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांनी आगारातच ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे गेल्या तासाभरापासून आगारातून सुटणाऱ्या सर्व बसफेऱ्या पूर्णपणे बंद झाल्या असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

किरकोळ वादाचे गंभीर हाणामारीत रूपांतर

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली बस स्थानकामध्ये तिकीट काढण्याच्या कारणावरून एसटी वाहक संजय अडकिने आणि काही प्रवाशांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली. मात्र, हा वाद इतका विकोपाला गेला की, काही प्रवाशांच्या टोळक्याने वाहक अडकिने यांना घेरून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या गंभीर हल्ल्यात वाहक अडकिने जखमी झाले असून, त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आगार परिसरात तणाव; प्रवाशांची गैरसोय

आपल्या सहकाऱ्यावर भरदिवसा बस स्थानकात झालेल्या हल्ल्यामुळे हिंगोली आगारातील चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी गाड्या बाजूला लावून काम बंद केले आणि आगाराच्या आवारातच ठिय्या मांडला. “जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना अटक करून त्यांच्यावर कडक गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत बस जागेवरून हलवणार नाही,” अशी आक्रमक भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

भररस्त्यात अचानक बसफेऱ्या बंद झाल्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांसह, महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. पोलीस प्रशासन सध्या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असून आगार परिसरात तणावाचे वातावरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

EPFO 3.0 Update: आता UPI द्वारे PF काढता येणार? ATM कार्ड मिळणार का? सोप्या...

0
EPFO 3.0 Update: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कोट्यवधी सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार EPFO 3.0 या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत असून...

IPL: सीएसकेमध्ये हार्दिक पांड्याची एन्ट्री? समोर आली मोठी अपडेट.

0
हार्दिक पांड्या:चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघात सामील होणार का, याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्टार भारतीय अष्टपैलू खेळाडूच्या संघात सामील होण्याबाबतच्या...

शाळेसमोर कचऱ्याचे साम्राज्य; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी सुरूआहे,खेळ वाळूज जिल्हा परिषद शाळेबाहेर दुर्गंधीचा विळखा, तातडीने स्वच्छतेची...

0
वाळूज:(प्रतिनिधी)पांडुरंग गायकवाड वाळूज येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेसमोर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. याच परिसरात शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत...

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाला नवे वळण; ‘नोकरीसाठी पैसे’ रॅकेटची चौकशी, १२५ नियुक्त्या तपासाच्या...

0
अयोध्या : प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले असून, मंदिरातील नोकऱ्यांसाठी पैशांच्या मोबदल्यात नियुक्त्या झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त...

गोपाळवाडी रोडवरील नगरकर बंगला ते कुद्री बंगला रस्त्यावर पावसात डांबरीकरण? कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांचा सवाल

0
दौंड:(प्रतिनिधी) संघराज गायकवाड दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील नगरकर बंगला ते कुद्री बंगला या रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्याच्या काळात सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाची...

error: Content is protected !!