Homeताज्या बातम्याचार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर पाकिस्तानच्या खेळाडूने घेतली फिरकी

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर पाकिस्तानच्या खेळाडूने घेतली फिरकी

चारराज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर पाकिस्तानच्या  खेळाडूने घेतली फिरकी…

इलेक्शन परिणाम २०२३  : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांतील विधानसभा निवडणूक म्हणजे लोकसभ २०२४ ची सेमी फायनल.

आतापर्यंतच्या आकडेवारीनूसार, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे. राजस्थानमध्ये सत्ताबदल होण्याची चिन्हं असून काँग्रेसची सत्ता जाण्याची दाट शक्यता आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाची दमदार कामगिरी पाहता त्यांचे कौतुक होत आहे. सत्ताधारी भाजपाचे नेते, कार्यकर्ते आतापासूनच विजय साजरा करू लागले आहेत. पण, तेलंगणात काँग्रेस आघाडीवर असून सत्ताधारी केसीआर यांचा पक्ष पिछाडीवर आहे.

काँग्रेसच्या पराभवानंतर अनेकांनी पक्षावर टीकास्त्र सोडले. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरियाने देखील काँग्रेसची फिरकी घेतल्याचे दिसते. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत ‘पनौती कोण?’ असा प्रश्न केला.

दरम्यान, वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यासाठी विविक्ष क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार झाले होते. यावरून खासदार राहुल गांधी यांनी भारताच्या पराभवास मोदी यांना जबाबदार धरले होते.

राहुल गांधींनी काय म्हटले होते?
राहुल गांधी यांनी राजस्थान येथे एका संभेला संबोधित करताना मोदींविरोधात पनौती शब्दाचा वापर केला होता. ज्यावरून चांगलेच राजकारण तापले होते. खरं तर यावेळी राहुल यांनी मोदींचे नाव घेतले नव्हते. त्यांनी म्हटले होते की, टीम इंडिया चांगली खेळत होती, पण ‘पनौती’ने भारताला हरवले.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने निवडणुकीसाठी तिकीट वाटप करताना कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मात्र जाहीर केला नाही. पंरतु, २०१८मध्ये भाजपाने मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. परिणामी तिन्ही राज्यात भाजपाचा पराभव झाला. मात्र यावेळी भाजपाने तसे केले नाही. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करणं टाळलं. भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने निवडणूक लढवली आणि त्याचा मोठा परिणामही दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

दौंडमध्ये जय मल्हार आषाढी पायी दिंडीचे भक्तिमय स्वागत; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांचा वारकरी...

0
दौंड: (प्रतिनिधी संघराज गायकवाड) जय मल्हार आषाढी पायी दिंडी, ढोकसांगवी (ता. शिरूर, जि. पुणे) पालखीचे श्री दत्त पीठ, दत्त मंदिर येथे अत्यंत भक्तिमय व...

भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक पातळीवर सुवर्णमय झेप!

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२६ मध्ये भारतीय संघाने सर्व पाच सुवर्णपदके पटकावत देशाचा गौरव उंचावला आहे. कोलंबियातील बुकारामांगा येथे...

दौंड परिसरातील पाच शाळांमध्ये ५० देशी वृक्षांचे वृक्षारोपण

0
दौंड, प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त केशव माधव विश्वस्त निधी आणि कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहर व ग्रामीण...

सहा महिन्यांनंतर बजाजनगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू १३ व १४ जुलै रोजी दोन...

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर परिसरात तब्बल सहा महिन्यांनंतर अतिक्रमण हटाव मोहिमेला आज (दि. १३ जुलै) सुरुवात करण्यात आली. एमआयडीसी प्रशासन, महसूल विभाग,...

error: Content is protected !!