Homeताज्या बातम्यालातूर जिल्ह्यात अवकाळी वादळ-वाऱ्यासह गारपीट; शेती पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हतबल

लातूर जिल्ह्यात अवकाळी वादळ-वाऱ्यासह गारपीट; शेती पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हतबल

विष्णू आचार्य (लातूर  प्रतिनिधी ) : रेणापूर तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील अनेक भागांत सोमवार दि. २३ रोजी दुपारी सुमारे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाल्याने गहू, हरभरा, ज्वारीसह इतर रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आंबा व द्राक्ष बागांनाही फटका बसला असून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेली पिके अक्षरशः अस्मानी संकटाने हिरावून घेतली आहेत.

गारपिटीचा जबर फटका

रेणापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतातील उभी पिके आडवी झाली. गारपिटीमुळे गव्हाच्या कणसांचे मोठे नुकसान झाले असून हरभऱ्याच्या शेंगा गळून पडल्या आहेत. ज्वारीची पिकेही वाऱ्याने आडवी झाली आहेत. बागायती क्षेत्रात आंब्याच्या मोहोराला व लहान फळांना मोठा फटका बसला, तर द्राक्ष बागांमध्ये घड तुटून पडल्याचे चित्र आहे.

विटभट्टी व ऊस वाहतुकीलाही फटका

अचानक आलेल्या पावसामुळे विटभट्टी व्यवसायिकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तयार विटा पावसात भिजल्याने त्यांचे नुकसान झाले. तसेच ऊस वाहतूक करणारी वाहने उसाच्या फडातच अडकून पडल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आधीच खरीपात फटका, आता रब्बीही संकटात

यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीनसारखे नगदी पीक पाण्यात वाहून गेले होते. त्या संकटातून सावरत शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने रब्बीची पेरणी केली होती. दिवस-रात्र कष्ट करून उभी केलेली पिके काढणीच्या उंबरठ्यावर असतानाच अवकाळी पावसाने घात केला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे हतबल झाला आहे.

पंचनामे करून तात्काळ मदतीची मागणी

नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. जिल्हा प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने मदतकार्य सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अवकाळी पावसाच्या या फटक्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!