Homeमहाराष्ट्र५०% आरक्षण मर्यादा ओलांडल्याने स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती

५०% आरक्षण मर्यादा ओलांडल्याने स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Times Of Maharashtra Desk : सुप्रीम कोर्ट  ने महाराष्ट्रातील ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरची स्थगिती कायम ठेवत राज्य सरकारला दिलासा नाकारला आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील प्रकरणावर झालेल्या सुनावणीत, अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रलंबित निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याच्या वतीने करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, आरक्षणाची घटनात्मक ५० टक्के मर्यादा ओलांडली गेली असल्याने उर्वरित निवडणुका सध्या घेता येणार नाहीत.

‘राहुल रमेश वाघ विरुद्ध केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार’ या याचिकेवर सुनावणी झाली. यापूर्वी बांठिया आयोगाच्या अहवालापूर्वीची स्थिती लक्षात घेऊन निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाने काही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षण ठरवताना मर्यादा ओलांडल्याचे निदर्शनास आले. परिणामी २२ जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत.

दरम्यान, १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका आधीच पार पडल्या आहेत. उर्वरित निवडणुका अनिश्चित काळासाठी प्रलंबित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ओबीसी आरक्षणाच्या वैधतेवर अंतिम सुनावणी लवकरच सुरू होणार असून, सर्व पक्षकारांना तयारी पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. राज्यातील स्थानिक राजकारणावर या निर्णयाचा मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!