Homeमहत्त्वाचेमहाराष्ट्र पोलीस दलात खळबळ; निरीक्षक रमेश तडवींचे जातिवाचक छळाचे गंभीर आरोप

महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ; निरीक्षक रमेश तडवींचे जातिवाचक छळाचे गंभीर आरोप

दिनेश चाफळकर (प्रतिनिधी रायगड ) : महाराष्ट्र राज्यातील पोलीस यंत्रणेला हादरवून टाकणारी गंभीर बाब समोर आली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने जातिवाचक अपमान, मानसिक छळ व दबावाचे गंभीर आरोप करत थेट वरिष्ठांकडे धाव घेतली आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे नमूद केले आहे.

तडवी यांनी सात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर वारंवार जातिवाचक शब्दांत अपमान, बदनामी आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. आपण आदिवासी भिल्ल समाजातील असल्यामुळे कमी लेखले जाते, बदलीची भीती दाखवली जाते तसेच अप्रत्यक्ष धमक्या दिल्या जातात, असा दावा त्यांनी पत्रात केला आहे. सततच्या तणावाचा परिणाम त्यांच्या कुटुंबीयांवरही होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

याशिवाय स्थानिक राजकीय प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एका गुन्ह्याच्या तपासात मंत्री भारत गोगावले यांच्या पुत्र विकास गोगावले यांना सहकार्य करण्यासाठी काही व्यक्तींना बेकायदेशीर अटक करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप पत्रात करण्यात आला आहे. आपण त्यास नकार दिल्यानंतरच लक्ष्य करण्यात आल्याचा दावा तडवी यांनी केला आहे.

या प्रकरणामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली असून सखोल चौकशीची मागणी होत आहे. वरिष्ठ पातळीवर या आरोपांची पडताळणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाधान लॉजवर पोलिसांचा छापा; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

0
दौंड( प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दि. ३० जुलै : दौंड तालुक्यातील मौजे गिरीम येथील वायरलेस फाटा, दौंड–पाटस रोडलगत असलेल्या 'समाधान लॉज' येथे दौंड पोलिसांनी...

शिरपूर तालुक्यातील आदर्श गाव अंतर्गत राज्याचे माजी सचिव जयंत भाटिया यांची जातोडा येथे भेट

0
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर विधान परिषद मतदार संघाचे आमदार मा. अमरीश भाई पटेल व शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष मा. भूपेश भाई...

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणींच्या शुभहस्ते शुभारंभ

0
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जयसिंग पंडित यांचे आवाहन गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि.३० (प्रतिनिधी) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने गेवराई शहरात १०० खाटांचे अत्याधुनिक आरोग्य सुविधांसह...

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

error: Content is protected !!