Homeक्राईमपुण्यात २ कोटींचा अंबरग्रीस मुद्देमाल जप्त – तिघांना अटक, एक फरार

पुण्यात २ कोटींचा अंबरग्रीस मुद्देमाल जप्त – तिघांना अटक, एक फरार

पुणे वन विभागाची मोठी कारवाई ; २ कोटींचा अंबरग्रीस मुद्देमाल जप्त – तिघांना अटक, एक फरार

पुणे :- पुणे वनविभागाच्या पथकाने कोथरूड–चांदणी चौक परिसरात सापळा रचून तब्बल २ कोटी रुपये किंमतीचा स्पर्म व्हेल माश्याची उलटी (अंबरग्रीस) जप्त केली. या कारवाईत तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.

वनविभागाला २१ ऑगस्ट रोजी तस्करांकडे अंबरग्रीस असल्याची माहिती मिळाली होती. वनसंरक्षक पुणे  आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते व  विभागीय वनअधिकारी (भूमी व कॅम्पा) अमोल थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक वनसंरक्षक विशाल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले, ऋषिकेश चव्हाण व इतर अधिकारी-कर्मचारी यांनी पथक तयार करून संशयितांना सायंकाळी ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्याकडून साधारण दोन किलो अंबरग्रीस आणि एक इनोव्हा कार जप्त करण्यात आली.

अंबरग्रीस बाळगणे व तस्करी करणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणी कलम २(३२), ९, ३९, ४४, ४८(अ), ४९, ५० व ५१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक आरोपींना प्रथम ३ दिवसांची वन कोठडी सुनावली होती. कोठडीचा कालावधी संपल्यानंतर २४ ऑगस्ट रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले असता अतिरिक्त ३ दिवसांची वन कोठडी देण्यात आली.

स्पर्म व्हेल हा अनुसूची-१ मधील संरक्षित व दुर्मिळ प्राणी असून त्याची उलटी परफ्युम उद्योगात टिकाऊ सुगंधासाठी वापरली जाते. प्राथमिक तपासात या तस्करीचे जाळे विस्तृत असल्याचे समोर आले असून आणखी व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे प्रशासनरत्न पुरस्काराने सन्मानीत

0
म्हसवड-माण (प्रतिनिधी महेश कांबळे) : तालुक्यातील म्हसवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे यांना दर्शक महोत्सवानिमित्त प्रतिष्ठा फाउंडेशन सांगली (तासगांव) यांच्यावतीने राज्यस्तरीय प्रशासनरत्न पुरस्कार...

दौंडमध्ये भीम महोत्सवात ४२ रक्तदात्यांचे रक्तदान; आंबेडकर-फुले जयंतीनिमित्त मानवंदना

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) :  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दौंड येथे  भीम महोत्सव २०२६ ...

पुण्याच्या डॉ. सुनिता तांडुळवाडकर यांची ISAR च्या 16व्या अध्यक्षपदी नियुक्ती; भारतातील फलनक्षमता उपचार क्षेत्राला...

0
Times Of Maharashtra Desk : आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त फलनक्षमता तज्ज्ञ आणि रुबी हॉल आयव्हीएफ एंडोस्कोपी सेंटरच्या प्रमुख डॉ. सुनिता तांडुळवाडकर यांनी आता इंडियन...

सिंहगड रोड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला अटक

0
Times Of Maharashtra Desk पुणे : सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका २७ वर्षीय तरुणाला अटक करून त्याच्याकडून घातक शस्त्रे जप्त केली आहेत....

संतोष भंडारी , केशव पंडितांच्या अटकेसाठी

0
गेवराई तालुका (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  ठेवीदार कलेक्टर व एसपी कार्यालयात धडकले गेवराई, दि.१८(प्रतिनिधी )_ १६ एप्रिल रोजी गेवराई येथील विविध क्रेडिट सोसायटी व...

error: Content is protected !!