टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या हाती लागले भयंकर पुरावे!बड्या अधिकाऱ्यांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): कायद्याचे रक्षण करणाऱ्या आणि महिलांच्या सुरक्षेच्या आणाभाका घेणाऱ्या पोलीस दलाला हादरवून सोडणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक माहिती ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’च्या हाती लागली आहे. राज्याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या पोलीस मुख्यालयात चक्क तीन महिला पोलिसांना अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे.
मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, शिस्तीच्या नावाखाली या महिला पोलिसांवर चक्क रायफली फेकून मारण्यात आल्या आहेत. एवढेच नाही, तर बांबूने त्यांना रक्ताळ होईपर्यंत झोडपून काढण्यात आले आहे. या अघोरी क्रूरपणाचे थेट आणि विदारक फोटो ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’च्या हाती लागले आहेत.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एवढी भीषण घटना मुख्यालयात घडूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली असून, या संपूर्ण प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हे कोणते पोलीस मुख्यालय आहे?
मुलींवर हा क्रूर अत्याचार करणारा तो अधिकारी कोण?
कोणते वरिष्ठ अधिकारी याला पाठीशी घालत आहेत?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि पुराव्यांसह ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ लवकरच या प्रकरणाचा महा-पर्दाफाश करणार आहे.
वाचत राहा… भाग २ मध्ये संपूर्ण पुराव्यांसह नावे उघड होणार!
उद्या येणार सर्व माहिती समोर
भाग 1
क्रमशः






















