दौंड(प्रतिनिधी- संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड येथील संजय कुलकर्णी यांची कन्या शमिष्का उर्फ श्रावणी कुलकर्णी हिने जपानमध्ये आयोजित 2026 World City Cup (Abacus, Mental Arithmetic & Mathematics Competition) स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक (Silver Medal) पटकावले आहे. तिच्या या यशामुळे दौंड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा ३० जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ताकासाकी अरेना, ताकासाकी (जपान) येथे पार पडली. जगातील विविध देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत शमिष्काने आपल्या बुद्धिमत्ता, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन केले.
तिच्या या यशाबद्दल शिव शक्ती सेवा मंडळ तसेच कटारिया परिवार यांच्या वतीने शमिष्का आणि तिच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. भविष्यातही ती अशाच प्रकारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवत दौंड आणि देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.






















