Homeताज्या बातम्या"जाचक GST त बदल करण्याची वेळ, आगामी अर्थसंकल्पात GST 2.0 आणा", काँग्रेसची...

“जाचक GST त बदल करण्याची वेळ, आगामी अर्थसंकल्पात GST 2.0 आणा”, काँग्रेसची मागणी

GST : भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कर दशहतवादाचा सामना लघु, छोटे, मध्यम व्यापारी यांना करावा लागत आहे. जीएसटी स्लॅबची रचना अत्यंत किचकट असल्याने व्यापाऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे.

तसेच देशातील नोकरदार, मध्यमवर्ग व सर्वसामान्य जनतेकडून सर्वात जास्त जीएसटी कर संकलन होत असून मुठभर श्रीमंतांवर मात्र कर सवलतींचा वर्षाव केला जात आहे, हे चित्र बदलण्यासाठी केंद्र सरकारने येत्या अर्थसंकल्पात जीएसटीमध्ये बदल करत जीएसटी २.० आणावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी केली आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना सचिन पायलट म्हणाले की, १ फेब्रुवारी २०२५ रोजी भाजपा सरकार केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात जनतेच्या हिताकडे लक्ष देऊन जीएसटी या अत्यंत किचकट, दहशत निर्माण करणाऱ्या कर रचनेत बदल केला पाहिजे. २०२१-२२ या वर्षात एकूण जीएसटीपैकी जवळपास दोन तृतीयांश किंवा ६४% लोकसंख्येच्या तळातील ५०% लोकांकडून आले तर फक्त ३% GST वरच्या १०% मधून आला. हा गरिबांवरचा कर आहे जो सतत वाढत जातो. आरोग्य विमा सारख्या अत्यावश्यक सेवांवर जीएसटी दर हा लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी १८% आहे. पॉपकॉर्नवर सुद्धा तीन प्रकारचा जीएसटी लावला जात आहे.

मोदी सरकार दरवर्षी रेकॉर्डब्रेक कलेक्शनचा दावा करते पण जेव्हा श्रीमंतांचा विचार केला जातो, तेव्हा २०१९ मध्ये कॉर्पोरेट करात २ लाख कोटी रुपयांची कपात केली. पंतप्रधान मोदी अरबपतींसाठी मोठी कर कपात देतात आणि गरीब आणि मध्यमवर्गांवर मात्र करांचा भार टाकतात. जीएसटीची विक्रमी वसुली होत असून देशातील सर्वात जास्त जीएसटी मध्यमवर्ग व सर्वसामान्य जनतेकडून जमा होतो. या घटकावरचा जीएसटीचा भार कमी करण्याची वेळ आली आहे त्यादृष्टीने सरकारने निर्णय घ्यावा व आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात GST 2.0 आणावा.

जीएसटीचा प्रस्ताव सर्वात प्रथम डॉ. मनमोहनसिंग यांनी आणला होता, त्याला भाजपाने तीव्र विरोध केला होता, आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विरोध केला होता. आधार कार्ड, डीबीटी, किरकोळ क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक या सर्वांना भाजपा व मोदींनी विरोध केला होता पण सत्तेत येताच काँग्रेसच्याच या योजना भाजपाने राबवल्या. जीएसटी लागू करण्यासाठी मध्यरात्री १२ वाजता मोठा गाजावाजा करून काहीतरी विक्रमी करत असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. गुंतवणूकीला काँग्रेसचा विरोध नाही पण ती मनमानी पद्धतीने केली जाऊ नये अशी काँग्रेसची भूमिका आहे.

भाजपा सरकार अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे चित्र निर्माण करत आहे पण वास्तविकता वेगळी आहे. जीडीपीमध्ये मोठी घसरण होत आहे. भारताला १० टक्के जीडीपीचे लक्ष्य ठेवून वाटचाल करावी लागेल, पण भाजपा सरकार कोणतेच खरे आकडे जाहीर करत नाही. भाजपा सरकारमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. सरकारला योग्य वाटतील तेच आकडे जाहीर केले जात आहेत. उलट काँग्रेस सरकार असताना जी वस्तुस्थिती आहे ती मांडली जात होती. दरडोई उत्पन्नाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. रोजगार निर्मिती होत नाही देशात प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे, तसेच महागाईसुद्धा वाढलेली आहे, असेही पायलट म्हणाले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सचिन पायलट म्हणाले की, लोकशाही, संविधान व देश हित लक्षात घेऊन काँग्रेससह अनेक पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे, ही आघाडी आजही मजबूत आहे. प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी असते त्यानुसार काही निर्णय घ्यावे लागतात याचा अर्थ इंडिया आघाडी कमजोर झाली, असे म्हणता येणार नाही असेही पायलट यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : पालम तालुक्यातील रावराजूर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दि. १४ एप्रिल) विविध कार्यक्रमांचे उत्साहात...

Bopodi: बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती…

0
Times Of Maharashtra Desk, Pune: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक...

NCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक निरीक्षक दीपक...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : येथील बसस्थानकात सध्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना, प्रवाशांमध्ये विविध अफवा पसरत असल्याचे दिसून येत...

जय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कारखान्याच्या कार्यालयात कार्यस्थळावर ‘डॉ....

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय...

error: Content is protected !!