Homeताज्या बातम्याजादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक आरोपीसह दोनजणांना...

जादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक आरोपीसह दोनजणांना अटक

जादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक आरोपीसह दोनजणांना अटक…

पुणे : जादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन व्यावसायिकाची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक करणार्या मुख्य आरोपीसह दोघांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल हुसेन हसनअली नईमआबादी व सीमा ऊर्फ रोहा अब्दुल हुसेन नईम आबादी (वय ३५, रा.

कॅम्प) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सीमा नईमआबादी हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते पळून गेले होते.

याप्रकरणात समर्थ पोलिसांनी नादीर अब्दुल हुसैन हसन अली नईमा आबादी (रा. सिनागग ईस्ट्रीट, कॅम्प), सीमा उर्फ रोया नादीर नईमा आबादी (वय ३५, रा. कॅम्प), मौलाना शोऐब मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), माजीद उस्मान आत्तार (रा. बोपोडी), खालीद मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), इरम शोऐब आत्तार (रा. बोपोडी) यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा कायदा तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. याबाबत शेख अब्दुल बासित अब्दुल लतिफ (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपींनी संगनमत करुन इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायात पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष फिर्यादींना दाखवले. शेख यांनी वेळोवेळी त्यांच्याकडे २ कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपींनी कोणताही परतावा न देता फसवणूक केली होती. याप्रमाणेच या आरोपींनी फसवणुक केल्याचे तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या चार गुन्ह्यांमध्ये एकू ६ कोटी २३ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.

पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी या आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश वेगवेगळ्या तपास यंत्रणेला दिले होते. समर्थ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सौरभ थोरवे व पोलिस अंमलदार हेमंत पेरणे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन या दोघांचा ठावठिकाणी कॅम्पमध्येच असल्याचे शोधून काढले व त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सौरभ थोरवे, ज्योती कुटे, पोलीस अंमलदार हेमंत पेरणे व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वृद्ध , दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी विशेष आधार सेवा शिबिर १३ व १४ जुलै...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)बीड ,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या...

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

error: Content is protected !!