Homeमहत्त्वाचेमांजरसुंबा येथे २३ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मांजरसुंबा येथे २३ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

गेवराई तालुका प्रतिनिधी:(विष्णू गायकवाड)
बीड (प्रतिनिधी) – तालुक्यातील मांजरसुंबा येथील 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 29 मार्च रोजी उघडकीस आली. या प्रकरणात प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण व धमक्या दिल्यामुळे मानसिक त्रास सहन न झाल्याने तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे (वय 23, रा. मांजरसुंबा, ता. जि. बीड) हा तरुण 29 मार्च रोजी सकाळी मांजरसुंबा येथील ‘हॉटेल नशीब’ परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला.
तपासादरम्यान मृताच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीत संबंधित तरुणाने प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या तणावाचा उल्लेख करत, मुलीच्या कुटुंबीयांकडून मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचे लिहिले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्यावर खोटा चोरीचा आरोप करून बदनामी केल्याचाही उल्लेख चिठ्ठीत करण्यात आला आहे.

मृताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 28 मार्च रोजी सकाळी ससेवाडी येथील प्रांजल उंदरे हिचे वडील, चुलते व भाऊ यांनी ज्ञानेश्वर याला पकडून मारहाण केली, शिवीगाळ केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकारामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता, असा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकतर्फे १०५ कर्मचाऱ्यांसाठी मोफत फायब्रोस्कॅन तपासणीद्वारे जनजागृती

0
११ जून २०२६, पुणे: जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि जीआय एंडोस्कोपी विभागातर्फे कॅन्सर सेंटर, रुबी हॉल क्लिनिक येथे हॉस्पिटल कर्मचारी...

error: Content is protected !!