Times of Maharashtra Desk, Mumbai : डेटा अॅनालिटिक्स आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन क्षेत्रात दोन दशकांचा अनुभव असलेल्या डेसिमल पॉइंट अॅनालिटिक्स या एआय-आधारित जागतिक अग्रणी कंपनीने आज मुंबईतील पवई येथे आपले अत्याधुनिक जागतिक मुख्यालय सुरू केल्याची घोषणा केली. कंपनीच्या वाढीच्या प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, हे केंद्र जागतिक पातळीवर एआय, अॅनालिटिक्स आणि एंटरप्राइज इनोव्हेशनला चालना देणार असल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
हिरानंदानी बिझनेस पार्कमध्ये अत्याधुनिक केंद्र
हिरानंदानी बिझनेस पार्क लाइटब्रिज पवई येथील आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणित इमारतीमध्ये हे नवे मुख्यालय असणार आहे. डेटा, एआय आणि डिझाइन थिंकिंग यांचा सुवर्णमध्य साधून इनोव्हेशन आणि सहकार्याला गती देणे हा या मुख्यालयाचा प्रमुख उद्देश असणार आहे. हे केंद्र पूर्णपणे हरित ऊर्जेवर अवलंबून असणार आहे. हे केंद्र संशोधन, प्रगत अॅनालिटिक्स आणि तंत्रज्ञान विकासाचे प्रमुख केंद्र म्हणून डीपीएच्या जागतिक परियोजनेचा केंद्रबिंदू बनेल, ज्यामुळे भारताचे महत्त्वाचे स्थान अधोरेखित होईल .
एआय-आधारित रोडमॅप आणि नेतृत्व संवाद
उद्घाटन कार्यक्रमात झालेल्या एका विशेष नेतृत्व संवादात, डीपीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागतिक स्तरावर एआयच्या माध्यमातून एंटरप्राइज निर्णय प्रक्रियेचे रूपांतर करण्याच्या दृष्टीने तयार केलेला रोडमॅप सादर केला. यावेळी बोलताना, डेसिमल पॉइंट अॅनालिटिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश धुरी म्हणाले, “जागतिक स्तरावर, सर्व स्तरांच्या संघटनांमध्ये एआय विचार, कृती आणि प्रगतीच्या पद्धती बदलत आहे, आणि या बदलाच्या केंद्रस्थानी असण्याचा आम्हाला अभिमान आहे. मुंबईतील आमचे नवे मुख्यालय भारतीय इनोव्हेशन किती पुढे आले आहे, याचे प्रतीक आहे. येथे विकसित होणारे उपाय जगभरात अधिक स्मार्ट, वेगवान आणि बुद्धिमान निर्णय घेण्यास मदत करतील.”
या नेतृत्व संवादामध्ये डीपीएचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी वैभव पुणेकर, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष समीर कुलकर्णी, मुख्य विपणन अधिकारी श्रीपाद नगरनाईक, मुख्य मानव संसाधन अधिकारी अरुण प्रताप सिंह व रेव्हेन्यू ऑपरेशन्स प्रमुख प्रसाद नवाथे यांनी देखील आपले विचार मांडले. त्यांनी डीपीएचा एआय-आधारित रोडमॅप, इंटेलिजन्ट ऑटोमेशन आणि निर्णय सहाय्य प्रणालींवरील भर तसेच कंपनीची नवी जागतिक ओळख यावर प्रकाश टाकला.
मुंबई, नाशिक, गिफ्ट सिटी, लंडन आणि न्यूयॉर्क येथे कार्यरत असलेली डेसिमल पॉइंट अॅनालिटिक्स कृत्रिम बुद्धिमत्ता,अॅनालिटिक्स आणि वित्तीय संशोधनाच्या संगमाला सतत नवी परिभाषा देत आहे. मुंबईतील हे नवे मुख्यालय डेटा इंटेलिजन्स, तंत्रज्ञान आणि मानवी अंतर्दृष्टीच्या माध्यमातून परफॉर्मन्स अॅडव्हांटेज प्रदान करण्याच्याकंपनीच्या ध्येयाची साक्ष असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.






















