Homeताज्या बातम्यादौंड शहरात अनधिकृत होर्डिंग-बॅनरप्रकरणी बहुजन समाज पक्षाचे निवेदन

दौंड शहरात अनधिकृत होर्डिंग-बॅनरप्रकरणी बहुजन समाज पक्षाचे निवेदन

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) :- शहरातील अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर व पोस्टर याबाबत होणाऱ्या कारवाईत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत बहुजन समाज पक्षाच्या वतीने दौंड नगरपरिषद प्रशासनास निवेदन देण्यात आले. बहुजन समाज पार्टीचे दौंड शहराध्यक्ष हर्षल राजू पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन ही मागणी मांडली.

दौंड शहरातील सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होर्डिंग, फ्लेक्स व बॅनर लावले जात असून त्यासाठी ठोस नियमावली आणि स्पष्ट कार्यपद्धती (SOP) नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नगरपरिषदेने यापूर्वी मंजूर केलेल्या ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. कोणत्या आधारावर परवानगी दिली जाते, किती शुल्क आकारले जाते आणि अनधिकृत होर्डिंगवर कोणती कारवाई होते, याची माहिती नागरिकांना उपलब्ध नाही, असेही नमूद करण्यात आले.

दौंड नगरपरिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर होर्डिंग, फ्लेक्स व बॅनर यांच्यासाठीची जागा निश्चिती, शुल्क आकारणी, परवानगी प्रक्रिया तसेच कारवाईची सविस्तर माहिती प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.

यावेळी बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दौंड शहर स्वच्छ, सुंदर व नियोजनबद्ध राहावे यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा बहुजन समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गोरगरीबांसाठी ‘देवदूत’ ठरत आहेत तहसीलदार अजय सकुंदरवार

0
सिरोंचा (प्रतिनिधी जाबिर खान) : सिरोंचा तालुक्याचे तहसीलदार अजय सकुंदरवार हे आपल्या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे, तत्पर प्रशासनामुळे आणि जनतेप्रती असलेल्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय...

खराडीत जमीन वादाला हिंसक वळण; नगरसेविकेचे पती प्रीतम खांदवे यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

0
पुणे: खराडी परिसरातील एका जागेच्या वादातून सुरक्षारक्षकास मारहाण केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेतील नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या...

माजी सैनिक स्व दत्तात्रय शिंदे यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे): स्वर्गीय दत्तात्रय शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि १० जून रोजी उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन, रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम व वृक्षारोपण...

आलेगाव-खोरवडी परिसरात मध्यरात्री सशस्त्र दरोडा; ७.१० लाखांचा ऐवज लंपास

0
दौंड (प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड): दि. १० जून : दौंड तालुक्यातील आलेगाव व खोरवडी परिसरात मध्यरात्री पाच ते सात अज्ञात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत...

दौंडच्या इतिहासात मानाचा तुरा; बारसा बॉईज फुटबॉल क्लबची चौथी भव्य स्पर्धा उत्साहात संपन्न

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड): बारसा बॉईज फुटबॉल क्लब, दौंड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली चौथी वार्षिक फुटबॉल स्पर्धा दिनांक ६ व ७ जून रोजी उत्साहपूर्ण...

error: Content is protected !!