Homeक्राईमPCMC: निवडणूक काळात खळबळ; पिंपरी चिंचवडमध्ये नकली दारू जप्त; मतदारांना वाटपाचा संशय...

PCMC: निवडणूक काळात खळबळ; पिंपरी चिंचवडमध्ये नकली दारू जप्त; मतदारांना वाटपाचा संशय…

 पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी: गणेश नारंग

Times of Maharashtra Desk, Pune: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग क्रमांक २१ मध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. निवडणूक आचारसंहितेची पायमल्ली करत मतदारांना वाटपासाठी नेली जात असलेली नकली दारू मोठ्या प्रमाणावर पकडल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सतर्कता दाखवत अंदाजे ११ बॉक्स नकली दारू जप्त केली. ही दारू वाहनातून वाहतूक केली जात असल्याचे समोर आले असून, कारवाईदरम्यान पाच ते सहा संशयित घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनेची माहिती मिळताच उमेदवार डब्बू आसवाणी आणि संदीप वाघेरे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निवडणूक आयोग आणि पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांना त्वरित माहिती दिली. माहिती मिळताच निवडणूक अधिकारी व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांनी सांगितले की,
“घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित वाहनासह सर्व नकली दारूचे बॉक्स ताब्यात घेण्यात येत असून, याप्रकरणी कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”

दरम्यान, उमेदवार डब्बू आसवाणी व संदीप वाघेरे यांनी प्रशासनासमोर गंभीर सवाल उपस्थित केला.

“जर ही नकली दारू मतदारांपर्यंत पोहोचली असती आणि त्यातून कोणाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा थेट प्रश्न त्यांनी विचारला.

कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बुलेट दुचाकीवरून दोन ते तीन संशयित फरार झाल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेमुळे निवडणूक काळात होणाऱ्या बेकायदेशीर प्रकारांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासन यापुढे कोणती ठोस कारवाई करते याकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडचे लक्ष लागले आहे.

निवडणूक काळात सुरक्षित आणि पारदर्शक वातावरण नियंत्रित राहण्यासाठी प्रशासनाची पुढील पावले निर्णायक ठरणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!