Homeमहाराष्ट्रश्री गोविंद विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

श्री गोविंद विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

सारनाथ अवचार (वाशिम प्रतिनिधी) : वाशिम जिल्ह्यातील पार्डी ताड येथील श्री गोविंद विद्यालयात २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक, कवी व कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर (कवी कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदानंद ठाकरे होते. त्यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मराठी भाषेचा गौरव आणि संवर्धन याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विनोदी बालनाटिकेने उपस्थितांची मने जिंकली. प्रथमेश कातडे, कार्तिक गावंडे, सार्थक मिरासे, समर्थ मस्के, आरव जाधव, रितेश ढळे, कुणाल लांभाडे, शुभ्रा सावरकर, ईश्वरी शेंद्रे, जयश्री जाधव, तन्वी येलकर व नंदिनी गावंडे यांनी उत्कृष्ट अभिनय करत कार्यक्रमात रंगत आणली.

तसेच अनुष्का भगत, ईश्वरी कुरवाडे व मोहिनी बोथे यांनी ही मायभूमी ही जन्मभूमी हे गीत सुंदर गायन व नृत्याद्वारे सादर करून सर्वांना भारावून टाकले.

यानंतर हर्षदा सावके, प्रणाली येलकर, सानिका पानभरे, गौरी कुरवाडे, ज्ञानेश्वरी सावके, श्रद्धा लांभाडे, श्रावणी कुटे, दिव्या भगत व अक्षरा पानभरे या विद्यार्थिनींनी कवी कुसुमाग्रज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाची माहिती दिली.

यावेळी मीना नानुटे व अध्यक्ष सदानंद ठाकरे यांनी मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश ठाकरे व अणेश मस्के यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल गावंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मीना नानवटे यांनी मानले.

मराठी भाषेच्या गौरवाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!