Homeआरोग्यहरभरा काढणीदरम्यान अपघात; थोडक्यात बचाव, शेतकऱ्यांना इशारा

हरभरा काढणीदरम्यान अपघात; थोडक्यात बचाव, शेतकऱ्यांना इशारा

विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी) :  बोदवड तालुक्यातील शेळवड येथे हरभरा काढणीदरम्यान एक गंभीर अपघात घडला. गावातील योगेश सिद्धार्थ बोदडे हे स्वतःच्या शेतात काढणीचे काम पाहत असताना चुकून काढणी यंत्राच्या हेडमध्ये अडकले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच शेतातील इतर मजूर व नागरिकांनी तत्काळ धाव घेतली आणि प्रसंगावधान राखत योगेश बोदडे यांना सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

सध्या हरभरा काढणीचा हंगाम सुरू असून अनेक ठिकाणी घाईगडबडीत काम सुरू आहे. यामुळे अशा अपघातांचा धोका वाढत असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. काढणी यंत्रे हाताळताना योग्य अंतर राखणे, यंत्र सुरू असताना जवळ न जाणे आणि सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, तसेच ट्रॅक्टर व हार्वेस्टर चालकांनी अधिक सतर्क राहून काम करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. “थोडा वेळ जास्त लागला तरी चालेल, पण सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची,” असा संदेश या घटनेतून देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे प्रशासनरत्न पुरस्काराने सन्मानीत

0
म्हसवड-माण (प्रतिनिधी महेश कांबळे) : तालुक्यातील म्हसवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे यांना दर्शक महोत्सवानिमित्त प्रतिष्ठा फाउंडेशन सांगली (तासगांव) यांच्यावतीने राज्यस्तरीय प्रशासनरत्न पुरस्कार...

दौंडमध्ये भीम महोत्सवात ४२ रक्तदात्यांचे रक्तदान; आंबेडकर-फुले जयंतीनिमित्त मानवंदना

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) :  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दौंड येथे  भीम महोत्सव २०२६ ...

पुण्याच्या डॉ. सुनिता तांडुळवाडकर यांची ISAR च्या 16व्या अध्यक्षपदी नियुक्ती; भारतातील फलनक्षमता उपचार क्षेत्राला...

0
Times Of Maharashtra Desk : आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त फलनक्षमता तज्ज्ञ आणि रुबी हॉल आयव्हीएफ एंडोस्कोपी सेंटरच्या प्रमुख डॉ. सुनिता तांडुळवाडकर यांनी आता इंडियन...

सिंहगड रोड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला अटक

0
Times Of Maharashtra Desk पुणे : सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका २७ वर्षीय तरुणाला अटक करून त्याच्याकडून घातक शस्त्रे जप्त केली आहेत....

संतोष भंडारी , केशव पंडितांच्या अटकेसाठी

0
गेवराई तालुका (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  ठेवीदार कलेक्टर व एसपी कार्यालयात धडकले गेवराई, दि.१८(प्रतिनिधी )_ १६ एप्रिल रोजी गेवराई येथील विविध क्रेडिट सोसायटी व...

error: Content is protected !!