Homeआरोग्यगेवराई तालुक्यात वीज कोसळून दोन बैल ठार

गेवराई तालुक्यात वीज कोसळून दोन बैल ठार

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील उमापूर शिवारात सोमवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. उमापूरपासून पश्चिमेला असलेल्या खंडोबा वस्तीवरील शेतकरी ज्ञानेश्वर संतराम लाळगे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या दोन बैलांवर वीज कोसळल्याने दोन्ही बैल जागीच ठार झाले.

दुपारी सुमारे चार वाजताच्या सुमारास तालुक्यात अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला होता. याच दरम्यान ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, मृत बैलजोडीची किंमत अंदाजे १ लाख ३२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच महसूल व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजता घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, गेवराई तालुक्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, विजांच्या कडकडाटासह पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!