Homeआरोग्यवीज कोसळून दोन तरुण जागीच ठार; एक गंभीर जखमी

वीज कोसळून दोन तरुण जागीच ठार; एक गंभीर जखमी

अंबड ( प्रतिनिधी विष्णू गायकवाड ) : तालुक्यातील महाकाळा परिसरात अवकाळी पावसादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती येथे घडली असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी महाकाळा येथील काही तरुण नाथनगर वस्ती जवळील लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी अचानक त्या झाडावर वीज कोसळली. या भीषण घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21 वर्ष) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20 वर्ष) हे दोघे तरुण जागीच ठार झाले.

या दुर्घटनेत आणखी एक तरुण गंभीररित्या भाजला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिस आणि महसूल प्रशासनालाही कळविण्यात आले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही तरुणांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांमुळे अवकाळी पावसादरम्यान झाडाखाली आश्रय घेणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

error: Content is protected !!