किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल शिरपुर येथे पुर्व प्राथमिक विभागात पदवी प्रदान सोहळा उत्साहात संपन्न झाला के.व्ही.टी.आर. सी.बी.एस.ई. स्कूल शिरपूर येथे पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. व तसेच विदयार्थ्यांना पुढील नवीन शैक्षणिक धोरणानुसार(NEP) इयत्ता पहिली यात प्रवेश करीत असल्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून व स्वागत गीताने करण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे शाळेचे संचालक भाऊसो डॉ.तुषारजी रंधे सर,खजिनदार आशाताई रंधे, ताईसो.सिमाताई रंधे, सचिव निशांतजी रंधे कन्या शाळेच्या प्राध्यापिका सारिका रंधे मैडम साई राम हॉस्पिटल चे सुधिर भदाने व विद्या हॉस्पिटल चे डॉ निलेश पवार डॉ तसनीम जळगावकर मैडम व विद्यालयाच्या प्राचार्य सुरेखा मिस्तरी उपप्राचार्य विवेक पाटिल तसेच समन्वयक सागर वाघ सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया अग्रवाल व सुवर्णा पाटिल यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पदवी प्रदान प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. त्यात आदर्श विद्यार्थी म्हणून नर्सरी क्लास मधून क्रिशा पाटिल व चैतन्या पाटिल एल.के.जी. क्लास चे स्वरांश गिरसे, कल्पेश पाटिल, जीविष्का पाटिल, तर यू.के.जी, क्लास मधुन रिदम सूर्यवंशी रितीका पाटिल व भाव्या चौहान या विद्यार्थ्यांना घोषित करण्यात आले. व शाळेच्या विद्यार्थीनी नी सुंदर असे भरतनाट्यम सादर केले.
तसेच यूकेजी च्या छोट्या चिमुकल्यांनी देखिल त्यांचा भाषणाद्वारे अनुभव व्यक्त केला याप्रसंगी बऱ्याच पालकांनी विद्यालयाचे व शिक्षकांचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली. या कार्यक्रमात ताईसो.सिमाताई रंधे व प्राध्यापिका सुरेखा मिस्तरि यांनी मुलांच्या पुढील वाटचालीस एक छान अशी शिकवण दिलीव या सोहळा बद्दल मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थीच्या आनंदासाठी सेल्फी कॉर्नर पण ठेवण्यात आला. व त्यानंतर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूर्व प्राथमिक शैक्षणिक वर्षाचे समन्वयक भटाबाई पाटिल सर्व पूर्व प्राथमिकच्या शिक्षिका तसेच प्राथमिक वर्गातील शिक्षक बंधू-भगिनींनी हि परिश्रम घेतले. तसेच वैशाली वाघ यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. शाळेच्या या उल्लेखनीय उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषारजी रंधे, सचिव श्री निशांतजी रंधे, खजिनदार सौ आशाताई रंधे, संचालक श्री मुख्याध्यापक, व्यवस्थापक, प्राध्यापक, शिक्षक तसेच संस्थेच्या इतर मान्यवरांनी व परिसरातील पालकांनी भरभरून कौतुक केले.






















