Homeमहत्त्वाचेवडगाव तेजन येथिल शेतकऱ्यांची एक हेक्टर आंब्याची बाग जळून खाक

वडगाव तेजन येथिल शेतकऱ्यांची एक हेक्टर आंब्याची बाग जळून खाक

 बुलढाणा ( प्रतिनिधी अनिल वायाळ) :
लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथील अतिशय मेहनती शेतकरी श्री सत्यनारायण परमेश्वर तेजनकर यांची कृषी विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तीन वर्षांपूर्वी एक हेक्टर फळबाग लागवड अंतर्गत आंबा लागवड केलेली होती.

सायंकाळी ठीक सहा वाजे दरम्यान सदर शेताच्या शेजारी असलेल्या सदाशिव चौगुले यांच्या शेतातील गव्हाच्या काडाला आग लागल्याने अचानक सुटलेल्या वाऱ्यावावधनाने सदर आग हि आंबा लागवड अंतर्गत असलेल्या गव्हाचे काडाकडे आली.व संपूर्ण आंब्याच्या बागेने काही क्षणात फार भयानक पेट घेतला.सदर परिस्थिती गावातील बऱ्याच गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सत्यनारायण तेजनकर यांच्या शेताकडे धाव घेऊन आग विझवण्याचा अतोनात प्रयत्न केला.परंतु ही आग एवढी भयानक होती की आग विझवणे शक्य न झाल्यामुळे गावकऱ्यांचे प्रयत्न फेल होऊन काही मिनिटातच सदर आंब्याच्या मळ्याचे होतेचे नव्हते झाले.

त्यामध्ये त्या झाडांसाठी फिनोलेक्स कंपनीची विस एम एम ड्रिप सुद्धा त्या आगीत जळून खाक झाले व स्पिंकलर संच सुद्धा जळून खाक झाल्यामुळे या शेतकऱ्यावर फार मोठा आघात झाला आहे.अतिशय रात्रंदिवस च्या मेहनती मधून हि बाग डोलताना दिसत होती व अवघ्या काही दिवसांवर या बागेचे आंब्याचे फळ सुद्धा खायच्या अवस्थेत असताना सदर आंब्याच्या बागेचे होतेचे नव्हते झाल्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

अतिवृष्टीनंतर पुन्हा आगि मुळे नुकसान
या आधि अतिवृष्टी व ढगफुटी मुळे शेतकरी सतीश तेजनकर यांच्या आंबेचे बागेचे नुकसान झाले होते.परंतु त्यांनी परत जिद्दीने झालेले नुकसान भरून काढले होते.वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.त्यामुळे सदर शेतकरी सतीश तेजनकर यांच्यावर कर्जाचा भार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब पंचनामा करून शेतकरी सतीश तेजनकर यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी जोर धरत आहे.तसेच अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शेतकऱ्यांना जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे.निसर्गाच्या सततच्या कोपामुळे शेतकऱ्याचे जीवन अस्थिर होऊन शासनाने अशा पीडित शेतकऱ्याला तात्काळ मदत करणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!