Homeराजकीयऑटो रिक्षा चालकांचा ८ एप्रिल रोजी जळगाव आरटीओ कार्यालयावर मोर्चा

ऑटो रिक्षा चालकांचा ८ एप्रिल रोजी जळगाव आरटीओ कार्यालयावर मोर्चा

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील ऑटो रिक्षा चालकांवर लादण्यात आलेल्या विविध शुल्क व नियमांविरोधात ऑटो रिक्षा चालक मालक संघटनांनी एकत्र येत ८ एप्रिल २०२६ रोजी जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर (आरटीओ) मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

ऑटो रिक्षा चालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीसाठी चालकांकडून ₹५०० प्रवेश फी आणि ₹३०० वार्षिक शुल्क आकारले जात असल्यामुळे चालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या रिक्षा चालकांवर हा अतिरिक्त भार अन्यायकारक असल्याचे संघटनांचे मत आहे.
संयुक्त कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले की, महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये ही सक्ती केली जात असून, नोंदणी न केल्यास परवाना नूतनीकरण, पासिंग इत्यादी कामे अडवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, ऑटो रिक्षा चालकांच्या हितासाठी स्वतंत्र व पारदर्शक कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यामार्फत विविध योजना राबवाव्यात, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असतानाही ठोस निर्णय न झाल्याने चालकांमध्ये असंतोष वाढला आहे.

८ एप्रिल रोजी होणाऱ्या या मोर्चात जळगावसह परिसरातील सर्व ऑटो रिक्षा चालक मालक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!