Homeआरोग्यअवकाळी पावसाचा कहर; विजेच्या तडाख्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तोंडले गावावर शोककळा

अवकाळी पावसाचा कहर; विजेच्या तडाख्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तोंडले गावावर शोककळा

म्हसवड – माण (प्रतिनिधी महेश कांबळे) : माण तालुक्यातील तोंडले गावात अवकाळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. लाला जाधव (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाला जाधव हे नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांसह तोंडले–वारुगड रस्त्यालगत असलेल्या माळरानात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास अचानक हवामानात बदल होऊन आभाळ दाटून आले. काही क्षणातच वाऱ्याचा वेग वाढला आणि अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. याचवेळी परिसरात विजांचा कडकडाट सुरू झाला.

या भीषण वातावरणात अचानक एका बाभळीच्या झाडावर वीज कोसळली. दुर्दैवाने त्या झाडाजवळच उभे असलेले लाला जाधव विजेच्या तडाख्यात सापडले आणि क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. निसर्गाच्या या रौद्र रूपामुळे एका कुटुंबाचा कर्ता पुरुष हिरावला गेला.

दरम्यान, संध्याकाळपर्यंत लाला जाधव घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत होते. त्यांच्या सोबत असलेली जनावरे व शेळ्या मात्र एकट्याच घरी परतल्याने अनर्थाची शंका अधिकच बळावली. कुटुंबीयांनी तात्काळ माळरानात धाव घेत शोधमोहीम सुरू केली.

ते नेहमी ज्या ठिकाणी जनावरे चारण्यासाठी जात असत, त्या परिसरात शोध घेत असताना बाभळीच्या झाडाजवळ लाला जाधव निपचित अवस्थेत आढळून आले. हे हृदयद्रावक दृश्य पाहताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या दुःखाने संपूर्ण परिसर सुन्न झाला.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व जाधव कुटुंबाला धीर दिला. पावसाच्या सरींमध्ये एक जीव कायमचा हरपल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबाचा आधारवड गमावल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. शासकीय सोपस्कार पूर्ण करून आपत्तीग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खेडमक्ता येथील ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा उघड; ब्रम्हपुरी पोलिसांकडून खरबीचा आरोपी जेरबंद

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी (रुपेश देशमुख) : ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमक्ता येथून चोरीला गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली शोधण्यात ब्रम्हपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला अवघ्या काही दिवसांत यश आले...

दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) : दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार सिन्नर तालुक्यातील पिंपळे येथील निकिता सुभाष पानसरे (शेळके) व पुनम सुभाष...

कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशात आणखी एक मानाचा तुरा तिघांची मुंबई पोलीस दलात...

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला...

निफाड तालुक्यात ‘गुरव पॅटर्न’ची जोरदार चर्चा चांगल्या लोकांसाठी मदतीचा हात गुन्हेगारांसाठी कायद्याचा कठोर बडगा!

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले) : निफाड तालुक्यात सध्या पोलीस निरीक्षक श्री. गणेशजी गुरव यांच्या कार्यशैलीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष...

गेवराईतील ज्येष्ठ नागरिक श्रीरंगराव काकडे यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील भगवान नगर येथील ज्येष्ठ नागरिक श्रीरंगराव काकडे (वय ७१) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सायंकाळी दुःखद निधन झाले....

error: Content is protected !!