Homeआरोग्यडॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता गेवराई क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पत्नीने बेशुद्ध अवस्थेत दाखल केले. त्यावेळी रुग्णाचे तापमान १०५.६°F दर्शविणार्‍या उच्च श्रेणीतील तापासह त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक अवस्थेत होती. रुग्णाच्या मेंदूला ताप गेल्यामुळे त्यांची शुद्धी पूर्णतः विस्कळीत झाली होती व त्यांना स्टेटस एपिलेप्टिकस (सातत्याने येणाऱ्या फिट्स/सीझर) चा त्रास होत होता. या गंभीर अवस्थेमुळे भद्री भोसले यांचे घरचे व नातेवाईक पूर्णपणे घाबरले होते. त्यावेळी डॉ. दिपक फाटक यांनी नातेवाईकांना प्रकृती व उपचारपद्धत समजावून सांगितले व सर्वांना धीर दिला.

यानंतर डॉ. दिपक फाटक यांनी रुग्णावर तात्काळ उपचार सुरू केले व NCCT ब्रेन (CT Scan) करून मेंदूची तपासणी केली. अशिक्षित असलेल्या नातेवाईकांना तपासणीचा अर्थ समजणे कठीण असल्यामुळे, डॉक्टरांनीच योग्य निर्णय घेत उपचारपद्धत सुरू ठेवली. रुग्णला सतत उच्च ताप राहिला व तो सुमारे ३ दिवस पूर्णपणे कोमामध्ये राहिला. भद्री भोसले यांची आर्थिक परिस्थिती गरीब असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. फाटक यांनी महागड्या चाचण्यांवर सवलत देऊन आवश्यक त्या तपासण्या करून घेतल्या.

पुढे रुग्णाच्या मानेच्या कडकपणाची (stiff neck) लक्षणे दिसल्यानंतर डॉ. फाटक यांनी मेंदू व पाठीच्या कण्यातील सेरेब्रोस्पायनल फ्लूइड (CSF) ची तपासणी करून त्यात मेनिंजायटिसची लक्षणे आढळली. त्यानंतर योग्य अँटिबायोटिक व योग्य औषधोपचारांचा अभियान सुरू ठेवला. त्याच्या परिणामस्वरूप तीन दिवसांनी भद्री भोसले यांना शुद्धी येऊ लागली. भद्री भोसले यांना दारू पिण्याची सवय असल्यामुळे पुन्हा विड्रॉल च्या अवस्थेत त्यांना पुन्हा फिट्स येऊ लागल्या. त्यावर डॉ. फाटक यांनी योग्य उपचार चालू ठेवल्याने दोन दिवसांतच रुग्ण विड्रॉलच्या अवस्थेतून बाहेर आला. अखेरीस भद्री भोसले पूर्णपणे बरे झाले, ते बोलू लागले, चालू लागले आणि फिरू लागले. त्यांच्या पत्नी, मुलां व नातेवाईकांना यामुळे मोठा आनंद झाला.

पैशाची अपेक्षा न ठेवता सामाजिक जबाबदारी व माणुसकी दाखवत डॉ. दिपक फाटक यांनी भद्री भोसले यांना जीवदान दिले. त्यांना ३० एप्रिल २०२६ रोजी डॉ. फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली डिस्चार्ज देण्यात आले. त्यावेळी आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित असलेले सामाजिक कार्यकर्ते कडूदास कांबळे यांनी व रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. फाटक यांचा आदरपूर्वक सन्मान करून त्यांचे आभार मानले.

डॉ. फाटक यांनी रुग्णाला फक्त उपचारच नव्हे तर आगामी दिशाही दिली. त्यांनी भद्री भोसले यांना आगामी जीवनात दारू सोडून आरोग्याचे जतन करण्याचे सक्षम मार्गदर्शन केले. सहा दिवसांत गंभीर अवस्थेतील रुग्णाला पूर्णपणे बरा करण्याच्या डॉ. दिपक फाटक यांच्या कर्तृत्वामुळे गेवराई शहरातील नागरिकांनी त्यांच्याबद्दल “गोरगरीबांचा खरा कैवारी, गरीबांचा आधार” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहीणी पवार यांच्यावरील वक्तव्याचा गेवराईत निषेध

0
राष्ट्रवादी काँग्रेसने केले तिव्र आंदोलन जाहीर निषेध गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना....

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

error: Content is protected !!