Homeमहाराष्ट्रजळगावात आंतरराज्य घरफोडी टोळीचा पर्दाफाश ११ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

जळगावात आंतरराज्य घरफोडी टोळीचा पर्दाफाश ११ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार) : जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी आंतरराज्य गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ११ लाख ५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तारा बिझनेस पार्क परिसरात २२ एप्रिल २०२६ रोजी चोरीची घटना उघडकीस आली होती. घरमालक कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा सुमारे १२ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान ही टोळी मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे समोर आले. पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेत अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये निलेश उर्फ भुरा माहोरिया, ताराचंद सोलंकी, राकेश सोलंकी, गोविंद उर्फ छोटू आहेर आणि दिलीप मंगा माहोरिया यांचा समावेश आहे. आरोपींकडून ३१ ग्रॅम सोन्याचे दागिने, १२ ग्रॅम चांदीचे दागिने आणि ५ लाख ७८ हजार रुपये रोख असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा मोठा हिस्सा परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आकोडे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

या कारवाईत पोउनि राहुल तारडे, पोहेकॉ चंद्रकांत धनके, प्रमोद लांडबंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, पोना मोतीलाल बोरेसे, विशाल कोळी, रामकांत साबळे, शशिकांत मराठे, नितीन ठाकूर आणि राहुल येथे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस पथकाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!