Homeताज्या बातम्याआष्टीची ‘सुपरवुमन’; १० व्यवसायांच्या माध्यमातून १०० महिलांना केले आत्मनिर्भर...

आष्टीची ‘सुपरवुमन’; १० व्यवसायांच्या माध्यमातून १०० महिलांना केले आत्मनिर्भर…

गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मुर्शिदपूर येथील सीमा बेगम जावेद सय्यद यांनी स्वतःच्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर एकाच वेळी तब्बल १० विविध व्यवसाय यशस्वीपणे उभे करत महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. घरातून सुरू केलेल्या छोट्या व्यवसायाला त्यांनी आज मोठ्या यशात रूपांतरित केले असून, त्यांच्या कार्याची परिसरात मोठी चर्चा होत आहे.

सीमा सय्यद या “सीमा लेडीज टेलर्स” या नावाने शिवणकला व्यवसाय आणि प्रशिक्षण वर्ग चालवतात. त्यांनी आतापर्यंत १०० हून अधिक महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देत आत्मनिर्भर बनवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या अनेक महिला आज स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना २०२४-२५ चा “बेस्ट टीचर अवॉर्ड” देऊन गौरविण्यात आले आहे.

सेंद्रिय आणि केमिकलमुक्त साबण निर्मिती हा त्यांचा विशेष चर्चेचा व्यवसाय ठरला आहे. कांदा, बटाटा, कोरफड आणि गुलाब यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून त्या विविध प्रकारचे साबण तयार करतात. त्यांच्या या उत्पादनांना बाजारात मोठी मागणी असून अनेक वृत्तपत्रांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.

याशिवाय त्या डॉग फार्मिंग, शेळीपालन, मांजर पालन, दळण गिरणी, आवळा कॅंडी निर्मिती आणि पेरू वडी निर्मिती असे विविध उद्योगही यशस्वीपणे सांभाळत आहेत.

सीमा सय्यद यांच्या घरातील असंख्य पुरस्कार, सन्मानचिन्हे आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या यशोगाथा त्यांच्या कार्याची साक्ष देतात. महिलांनी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही क्षेत्र जिंकू शकते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!