म्हसवड (प्रतिनिधी महेश कांबळे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या एसएससी बोर्ड परीक्षा २०२६ च्या निकालात म्हसवड येथील आत्मगिरी माध्यमिक विद्यालयाने शंभर टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील स्वरांजली गजकुमार ढोले हिने ९४.४० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला असून म्हसवड केंद्रात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल अंतर्गत चालणाऱ्या आत्मगिरी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यालयातील प्रथम चार गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत — स्वरांजली गजकुमार ढोले ९४.४० टक्के, दर्शनी ज्ञानेश्वर लोखंडे ९३.६० टक्के, सुहानी संतोष लोखंडे ९०.८० टक्के आणि सार्थक दवन खांडेकर ९०.४० टक्के.
यावर्षी विद्यालयातून एकूण ८२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ३६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर ७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवून यश संपादन केले. विद्यालयाच्या या उल्लेखनीय निकालामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, सचिव सौ. सुलोचना बाबर, उपाध्यक्ष ॲड. इंद्रजित बाबर, तात्यासाहेब औताडे, शरयू देवकर बाबर, हर्षदा बाबर, मुख्याध्यापक अनिल माने, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकांनी अभिनंदन केले आहे.





















