Homeमहाराष्ट्रदौंडमध्ये वंचित बहुजन आघाडीत युवकांचा मोठ्या संख्येने प्रवेश

दौंडमध्ये वंचित बहुजन आघाडीत युवकांचा मोठ्या संख्येने प्रवेश

दौंड (प्रतिनिधी-मयूर साळवे,संघराज गायकवाड)

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन दौंड शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो युवकांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा सहकार चौक येथील हॉटेल सिटी इन येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राजकुमार साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. दौंड तालुका अध्यक्ष अक्षय शिखरे व तालुका कार्यकारिणीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित युवकांनी पक्षाचे झेंडे हाती घेत वंचित बहुजन आघाडीच्या विचारांशी बांधिलकी व्यक्त केली.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजकुमार साहेब म्हणाले, आजच्या राजकीय परिस्थितीत युवकांना योग्य दिशा देण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बहुजनांच्या हक्कासाठी लढणारा हा पक्ष असून दौंड तालुक्यातील युवकांचा वाढता प्रतिसाद परिवर्तनाची नांदी आहे.

पक्षात प्रवेश केलेल्या युवकांनी बेरोजगारी, शिक्षण, शेतकरी व आरोग्याच्या प्रश्नांवर संघर्ष करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा पर्याय निवडल्याचे सांगितले. संविधानवादी विचार पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास तालुकाध्यक्ष अक्षय शिखरे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत पाडळे, जिल्हा महासचिव सतीश साळवे, तालुका उपाध्यक्ष शुभम वानखेडे, सचिव राजेश ओहोळ, कार्याध्यक्ष सुरज माने, यश खोमणे, संघटक विशाल कांबळे, विशाल चंद्रमोरे, गौरव ढवळे, गौरव शिंदे, दीपक पवार, बाळासाहेब गायकवाड, अॅड. किरण लोंढे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश नडगमकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षय शिखरे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!