Homeमहाराष्ट्रआष्टीची 'सुपरवुमन' सीमा सय्यद

आष्टीची ‘सुपरवुमन’ सीमा सय्यद

 गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : चूल आणि मूल’ ही पारंपरिक चौकट मोडून एखादी महिला जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहते, तेव्हा ती केवळ एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण समाजाचा विकास करते. आज आपण अशाच एका ‘सुपरवुमन’ची प्रेरणादायी यशोगाथा पाहणार आहोत. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मुर्शिदपूरच्या सीमा बेगम जावेद सय्यद… ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर घरबसल्या एक-दोन नव्हे, तर तब्बल १० व्यवसाय यशस्वीरीत्या चालवून ‘नारी शक्ती’चा एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर उभा केला आहे.

सीमा सय्यद यांचा ‘सीमा लेडीज टेलर्स’ नावाने व्यवसाय आणि शिवणक्लास चालतो. त्यांनी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त महिलांना शिवणकामाचे यशस्वी प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेल्या या महिला आज स्वावलंबी होऊन कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. त्यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना नुकतेच २०२४-२०२५ च्या ‘बेस्ट टीचर अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे.

सीमा यांच्या यशाची कमान इथेच थांबत नाही. त्यांचा सर्वात नाविन्यपूर्ण उद्योग म्हणजे केमिकलमुक्त सेंद्रिय साबण निर्मिती! कांदा, बटाटा, कोरफड आणि गुलाब यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून त्या दर्जेदार घरगुती साबण बनवतात, ज्याला बाजारात प्रचंड मागणी आहे. याव्यतिरिक्त डॉग फार्मिंग म्हणजेच श्वान पालन, शेळीपालन, मांजर पालन, दळणाची गिरणी, आणि आवळा कॅंडी तसेच पेरूची वडी निर्मिती असे तब्बल १० व्यवसाय त्या अतिशय कुशलतेने सांभाळतात.

सीमा यांच्या या जिद्दीची आणि कष्टांची दखल अनेक सामाजिक संस्था, कृषी विज्ञान केंद्रे आणि प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. त्यांच्या घरातील भिंतीवर लागलेले असंख्य पुरस्कार आणि सन्मानचिन्हे त्यांच्या या अफाट कर्तृत्वाची साक्ष देतात. एखाद्या महिलेने मनात आणले तर ती कोणत्याही संकटावर मात करून यशाचे शिखर गाठू शकते, हेच सीमा सय्यद यांनी सिद्ध केले आहे. त्यांचा हा प्रवास महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण आणि शहरी महिलेला नवी ऊर्जा देणारा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!