Homeताज्या बातम्यासायबर सेलच्या मदतीने ब्रह्मपुरी पोलिसांनी शोधून दिले १५ मोबाईल!

सायबर सेलच्या मदतीने ब्रह्मपुरी पोलिसांनी शोधून दिले १५ मोबाईल!

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :

केंद्र सरकारच्या अत्याधुनिक ‘सीईआयआर’ पो र्टल आणि सायबर सेलच्या तांत्रिक मदतीने ब्रह्मपुरी पोलिसांनी परिसरातून गहाळ झालेले तब्बल १५ मौल्यवान मोबाईल शोधून काढण्यात मोठे यश मिळवले आहे. हे हस्तगत केलेले सर्व मोबाईल पोलीस प्रशासनातर्फे त्यांच्या मूळ मालकांना सन्मानाने परत करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नागरिकांचे मोबाईल गहाळ आणि चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत ब्रह्मपुरी पोलिसांनी सायबर सेलच्या माध्यमातून आणि ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ प्रणालीचा प्रभावी वापर करत तांत्रिक तपास सुरू केला. गुन्हे शोध पथकाने तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून अथक परिश्रमांनंतर एकूण १५ मोबाईल्सचा शोध लावला.

ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या हस्ते पोलीस ठाण्यात मूळ मोबाईल धारकांना त्यांचे फोन परत देण्यात आले. अनेक दिवसांपूर्वी हरवलेले आपले महागडे फोन पुन्हा हातात मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. नागरिकांनी या तत्पर कारवाईबद्दल ब्रह्मपुरी पोलिसांचे जाहीर आभार मानले.

सदर कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजबे, पोलीस अंमलदार निलेश तुमसरे, स्वप्निल पळसपगार, प्रवीण भिवगडे, इरशाद खान आणि वशिष्ठ रंगारी यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!