Homeताज्या बातम्यासायखेडच्या आरूढ विद्यालयात ३६ वर्षांनंतर आठवणींचा जागर

सायखेडच्या आरूढ विद्यालयात ३६ वर्षांनंतर आठवणींचा जागर

सायखेड (प्रतिनिधी  योगेश कर्डिले , उत्तम जाधव): सायखेड येथील म्हळसाकोरेच्या आरूढ विद्यालयातील १९८८-८९ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल ३६ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत जुन्या मैत्रीचे बंध अधिक दृढ केले.

या स्नेहमेळाव्याचे आयोजन माजी विद्यार्थी श्री. संजयजी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. कार्यक्रमास माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच शाळेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. डेर्ले मॅडम यांनी केले, तर श्री. महेश अहिरे यांनी सूत्रधाराची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. आव्हाड मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी मा. डी. के. डेर्ले सर, मा. ए. एम. शिंदे सर, मा. आर. एम. फड सर यांच्यासह अनेक गुरुजन उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करत जीवनमूल्ये जपण्याचा संदेश दिला.

स्नेहमेळाव्यात प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त करत शालेय जीवनातील गमती-जमती, वर्गातील खोड्या, सहली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले अविस्मरणीय क्षण आठवले. “कधीकाळी वर्गात खोड्या करणारी मुले आज आजी-आजोबा झाली आहेत,” या आठवणींनी उपस्थितांमध्ये हशा आणि भावनिक वातावरण निर्माण केले.

यानंतर सर्वांनी एकत्रितपणे स्नेहभोजनाचा तसेच आंबा रसाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील कर्मचारी नानासाहेब काबळे व प्रकाश साळवे यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या संस्मरणीय स्नेहमेळाव्याचे छायाचित्रण व व्हिडिओ चित्रिकरण करण्यात आले असून, भविष्यातही अशाच प्रकारे एकत्र येण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

error: Content is protected !!