Homeताज्या बातम्यासिन्नर नगरपरिषदेत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांची आढावा बैठक; सफाई कर्मचाऱ्यांच्या...

सिन्नर नगरपरिषदेत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांची आढावा बैठक; सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा

सिन्नर:(नवनाथ आव्हाड )महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी सिन्नर नगरपरिषदेला भेट देऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या, सेवाविषयक बाबी तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. नगरपरिषद कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित बैठकीत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, विभागप्रमुख, अधिकारी आणि सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत आरोग्य विभाग, आस्थापना विभाग, कर विभाग आदींच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. तसेच २५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम सफल्य योजनेअंतर्गत मिळणारे लाभ, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सफाई कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय सुविधा, सुरक्षित कामकाजासाठी आवश्यक उपाययोजना, आरोग्यविषयक सुविधा, सेवाविषयक अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्या प्राधान्याने सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
मुख्याधिकाऱ्यांनी नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. बैठकीच्या शेवटी उपस्थितांनी सूचना व अपेक्षा मांडल्या, तसेच सर्वांचे आभार मानून बैठकीची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते आणि राष्ट्रचेतनेचे जागृत शिल्पकार

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनीधी: " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच . " या एका घोषणेने लाखो भारतीयांच्या मनामध्ये...

error: Content is protected !!