देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना महाराष्ट्र शासनाने निर्णय क्रमांक कृक्रमा ०५२६/प्रक९३/का २स नुसार फसवी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. अनेक अटी व शर्ती घालून केलेली कर्जमुक्ती घोषणा ही शेतकऱ्यांची फसवणूक करणारी असून कर्जमुक्ती होणारच नाही असे नियोजन या दिनांक 2 जून 2026 च्या शासन निर्णयामध्ये केलेले आहे. शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झाला असताना हा फसवा शासन निर्णय काढल्याबद्दल आम्ही काँग्रेसच्या या निर्णयाचा निषेध करतो तरी या फसव्या कर्जमाफी शासनाने रद्द करून सरसकट कर्जमाफी चा निर्णय निर्गमित करावा व शेतकऱ्यांना शासनाने न्याय द्यावा ही काँग्रेस पक्ष मागणी करीत आहे . असे निवेदन दिनांक १६जून २०२६रोजी माननीय उपविभागीय अधिकारी सिनखेडराजा यांना दिले आहे. निवेदनावर राम विजय बुरुंगले सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, प्रकाश पाटील जिल्हाध्यक्ष बुलढाणा, रमेशजी कायंदे सरचिटणीस काँग्रेस कमिटी बुलढाणा, सुनील जायभाये तालुका अध्यक्ष सिंदखेडराजा, कदीर कुरेशी शहराध्यक्ष सिनखेडराजा, रामदास डोईफोडे तालुकाध्यक्ष देऊळगाव राजा, शौकत भाई, नामदेव राठोड, रवी काकडे, दिलीप गाडेकर, सदानंद वाघमारे विकास, भैय्या विलास जाधव, सत्यजित खरात, प्रकाश राजे जाधव ,अ.रहेमान, माधव काळुसे, तुषार खरे, आतिश कासारे, विश्वजीत पडोळ, शिवराज पाटील इत्यादींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.






















