गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव (ता.गेवराई) येथे पुरुषोत्तम मास निमित्त महंत दत्तात्रय महाराज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तर काल्याचे कीर्तनाने येथील सप्ताहाची उत्साहात सांगता झाली. कीर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

गेवराई तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव येथे अधिकमास (पुरुषोत्तम मास) निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तर या सोहळ्यात भजन, कीर्तन, प्रवचन सह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तर सोहळ्याची शुक्रवारी काल्याचे कीर्तनाने उत्साहात सांगता झाली. यावेळी संस्थानचे महंत दत्तात्रय महाराज गिरी, भाजप तालुका समन्वयक श्रीकांत सानप, अनिरुद्ध लोंढे, कैलास म. गिरी, शंतनू म. गिरी , संस्थानचे सचिव रामबप्पा लेंडगुळे, नामदेव पौळ, श्रीधर पौळ, पत्रकार विनोद पौळ, विकास पवार , शाहूराव खरात, श्रीराम म.पांगरे, महादेव म.बिचकुले, पांडुरंग खेडकर यांच्यासह पंचक्रोशीतील टाळकरी, वारकरी, भजनी मंडळ तसेच महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनानंतर शेवटी उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.






















