Homeताज्या बातम्यापुणे रेल्वे पोलीस अधीक्षकांच्या बदली धोरणावर प्रश्नचिन्ह; दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांबाबतही...

पुणे रेल्वे पोलीस अधीक्षकांच्या बदली धोरणावर प्रश्नचिन्ह; दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांबाबतही चर्चा

पुणे (मुज्जम्मील शेख): पुणे रेल्वे पोलीस दलात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या बदली प्रक्रियेबाबत सध्या पोलीस वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. बदली प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांकडून पसंतीची पाच ठिकाणे मागविण्यात आली होती. मात्र अनेक कर्मचाऱ्यांना त्यांनी नमूद केलेल्या पाच ठिकाणांऐवजी इतरच ठिकाणी नियुक्ती मिळाल्याचा दावा काही कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या कौटुंबिक, आरोग्यविषयक व वैयक्तिक परिस्थितीचा विचार करून पसंतीची ठिकाणे नमूद केली होती. मात्र अंतिम बदली आदेशांमध्ये त्या ठिकाणांचा विचार न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे.

याच पार्श्वभूमीवर एका महिला कर्मचाऱ्याच्या बदलीबाबतही विविध चर्चा सुरू आहेत. संबंधित महिला कर्मचाऱ्यांची दूरस्थ ठिकाणी बदली करण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यानंतर त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणात बदल करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. मात्र या संदर्भातील अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

दरम्यान, रेल्वे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कार्यपद्धतीबाबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे. पुणे रेल्वे पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारित असलेल्या विविध रेल्वे पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असताना, काही कर्मचारी दीर्घकाळ एकाच कार्यालयात किंवा त्याच प्रशासकीय परिसरात कार्यरत असल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे.

यामध्ये सुधीर जगताप (सहायक पोलीस उपनिरीक्षक), प्रमोद लांब (पोलीस हवालदार), शोभा गायकवाड, अशोक गलगटे (पोलीस उपनिरीक्षक) आणि माधुरी कांबळे या कर्मचाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. सूत्रांच्या दाव्यानुसार, यापैकी काही कर्मचारी अनेक वर्षांपासून अधीक्षक कार्यालयात किंवा त्याच प्रशासकीय परिसरात कार्यरत आहेत.

त्यामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या असताना, दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांबाबत कोणती भूमिका घेण्यात आली, असा प्रश्न पोलीस वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. बदली धोरणाची अंमलबजावणी सर्वांसाठी समान निकषांवर झाली का, याबाबतही चर्चा सुरू आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची बाजू समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या रेल्वे पोलीस दलात बदली प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत आणि दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित होत असल्याचे चित्र दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!