Homeताज्या बातम्यासमुदाय आरोग्य अधिकारी यांच्या 1974 पदांची भरती प्रक्रिया ७ महिन्यां पासून रखडली...

समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या 1974 पदांची भरती प्रक्रिया ७ महिन्यां पासून रखडली !

गेवराई तालुका प्रतिनिधी विष्णू गायकवाड: राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदाच्या 1974 जागांसाठी निघालेल्या भरती प्रक्रियेला सध्या पूर्णपणे स्थगित आली आहे.
या पदासाठी राज्यभरातील अंदाजे 23 ते 25 हजार‌ BSC Nursing, BAMS व BUMS पदवीधर उमेदवारांनी अर्ज केले होते.
या पदासाठी BHMS+CCMP पदवीधरांनाही पात्र करावे यासाठी काही BHMS पदवीधर उमेदवारांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली ( नंबर 7967/2025 व W.P.No. 7594/2025 ) प्रकरणाच्य सुनावणीमध्ये मा.न्यायालयाने या भरती प्रक्रियेला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देत केंद्र व राज्य सरकारला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे समुदाय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेला ब्रेक लागला आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2 डिसेंबर 2025 रोजी टेक्निकल कमिटी/टास्क फोर्स गठीत केली. या समितीत आयुष मंत्रालय, नॅशनल मेडिकल कमिशन, इंडियन नर्सिंग कौन्सिल चे प्रतिनिधी आहेत.ही समिती BHMS + CCMP उत्तीर्ण उमेदवारांना या पदासाठी पात्र करता येईल की कसे याचा अभ्यास करून अहवाल सादर करणार होती पण 6 महिने उलटूनही याबाबत अंतिम निर्णय झालेला दिसत नाही.
समुदाय आरोग्य अधिकारी यांची 1974 पदे रिक्त असल्याने त्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा कोलमडू शकते.कारण समुदाय आरोग्य अधिकारी हे आजच्या प्राथमिक आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत.
तसेच समुदाय आरोग्य अधिकारी यांची सन‌ 2024-2025 मधील बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परंतु गडचीरोली,पालघर,सिंधुदुर्ग या सारख्या आदिवासी व दुर्गम जिल्ह्यांमधील समुदाय आरोग्य अधिकारी यांना बदली मिळून 1 वर्ष होत आहे तरी त्यांना कार्यमुक्त केल्या जात नाही.याबाबत विचारणा केली असता असे सांगण्यात येत आहे की नवीन पद भरती झाल्यानंतरच त्यांना कार्यमुक्त करण्यात येईल.
“राज्य सरकारने केंद्र सरकार कडे योग्य तो पाठपुरावा करत न्यायालयाला पण विनंती करून समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या पदभरती च्या स्थगितीवरील याचीका फास्टट्रॅक वर घेऊन लवकर निकाल लावावा अशी विनंती करावी तसेच दुर्गम भागातील बदली झालेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांना तात्काळ कार्यमुक्त करावे ही नम्र विनंती”
श्री दत्ता शांतिनाथ मुळे
राज्य अध्यक्ष अखिल भारतीय समुदाय आरोग्य अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!