Homeताज्या बातम्याडॉ. धनराज खानोरकर यांच्या लेखणीचा बहुमान; 'संजोरी' ग्रंथातील लेख अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

डॉ. धनराज खानोरकर यांच्या लेखणीचा बहुमान; ‘संजोरी’ ग्रंथातील लेख अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): झाडीपट्टीच्या साहित्यिक व सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा रोवला गेला असून, ब्रह्मपुरी येथील प्रसिद्ध कवी, लेखक तथा स्तंभलेखक डॉ. धनराज खानोरकर यांच्या लेखणीचा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने गौरव केला आहे. डॉ. खानोरकर यांच्या ‘संजोरी’ या बहुचर्चित ललित ग्रंथातील ‘पहाटेची काकड आरती म्हणजे अध्यात्मिक विविध भारती’ या लेखाचा समावेश अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. विद्यापीठाने अधिकृत पत्राद्वारे डॉ. खानोरकर यांना या बहुमानाची माहिती दिली आहे.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. भाग-२ (सत्र ४) करिता मायनर डीएसई मराठी साहित्य या अभ्यासपत्रिके अंतर्गत ‘वैदर्भीय निवडक गद्य: मुक्ताक्षरे’ हे पुस्तक अभ्यासाला आहे. या पुस्तकात वैदर्भीय साहित्याचे प्रतिनिधी म्हणून डॉ. खानोरकर यांच्या लेखाला स्थान देण्यात आले आहे.

डॉ. धनराज खानोरकर हे स्थानिक नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ‘संजोरी’ हा ललितग्रंथ झाडीबोलीतील लोकोत्सव, लोकसंस्कृती आणि लोककलेवर आधारित असून तो अत्यंत लोकप्रिय ठरला आहे. विशेष म्हणजे, या ग्रंथाची साहित्यिक उंची लक्षात घेऊन गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने यापूर्वीच संपूर्ण ‘संजोरी’ ग्रंथ आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. त्यानंतर आता अमरावती विद्यापीठानेही त्यांच्या लेखाचा अभ्यासक्रमात समावेश केल्याने डॉ. खानोरकर यांच्या साहित्यिक योगदानावर पुन्हा एकदा मोहर उमटली आहे.

डॉ. खानोरकर हे एक अष्टपैलू लेखक, पत्रकार आणि प्रगल्भ वक्ते म्हणून परिचित आहेत. त्यांनी ३३ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अत्यंत यशस्वीपणे भूषविले आहे. त्यांच्या नावावर ५ कवितासंग्रह आणि ६ संपादित ग्रंथ प्रकाशित आहेत. साहित्यासोबतच संशोधनातही त्यांचा मोठा दबदबा असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे ४० शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांचा ‘काळोखातले काजवे’ हा नवा व्यक्तिचित्रणपर लेखसंग्रह देखील लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहे.

शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील या उत्तुंग यशाबद्दल नेवजाबाई हितकारिणी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्नेहलता भैया, उपाध्यक्ष अँड. प्रकाश भैया, सचिव अशोक भैया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, मित्रमंडळी तसेच झाडीपट्टीतील साहित्य वर्तुळातून डॉ. धनराज खानोरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर येथे शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा!

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): करवंद नाका जनसंपर्क कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन; उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप येथील शिरपूर शिवसेना जनसंपर्क कार्यालय, करवंद नाका येथे शिवसेना...

‘एक घर – एक झाड’ उपक्रमांतर्गत हजारो रोपांचे मोफत वाटप

0
सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): शहरातील वाढते तापमान, प्रदूषण आणि पाणीटंचाईच्या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने ‘एक घर - एक झाड’ हा महत्त्वाकांक्षी पर्यावरणपूरक...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी धरणे आंदोलन.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे): दिनांक 19 जून 2026 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बस स्टॅन्ड चौक देऊळगाव राजा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी...

६० हजारांची स्प्लेंडर चोरणारा विधीसंघर्ष बालक ब्रम्हपुरी पोलिसांच्या जाळ्यात

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): ब्रह्मपुरी येथील नागेश्वर नगर भागातून चोरीला गेलेली दुचाकी अवघ्या काही दिवसांत शोधण्यात ब्रम्हपुरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी...

कोडीद येथे जागतिक सिकलसेल दिन उत्साहात साजरा शालेय रॅली व तपासणी शिबिराचे...

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) कोडीद, दि. 19 जून 2026: आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद अंतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळा कोडीद व जिल्हा परिषद शाळा चाकडू व...

error: Content is protected !!