Homeताज्या बातम्यादुष्काळावर मात करण्यासाठी पारंपरिक जलस्रोत संवर्धन गरजेचे. लांबलेल्या पावसामुळे पाणीटंचाईची भीती

दुष्काळावर मात करण्यासाठी पारंपरिक जलस्रोत संवर्धन गरजेचे. लांबलेल्या पावसामुळे पाणीटंचाईची भीती

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): यंदा पावसाचे आगमन लांबल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. वाढत्या उन्हामुळे विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांवर ताण वाढत असून भूजल पातळीही कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत भविष्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी गावातील सार्वजनिक जुन्या विहिरी आणि तलावांचे जतन व संवर्धन करणे गरजेचे झाले आहे. कधीकाळी गावाच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य आधार असलेल्या या जुन्या विहिरी आणि तलावांकडे आज दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. अनेक विहिरींमध्ये गाळ साचला आहे, काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे तर काही विहिरी पूर्णपणे बुजवून टाकण्यात आल्या आहेत. अनेक जुने तलावही देखभालीअभावी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एकेकाळी गावाची तहान भागवणारे आणि शेतीला आधार देणारे हे जलस्रोत आज उपेक्षित झाले आहेत. गावातील जुने तलाव हे केवळ पाणी साठवण्याचे ठिकाण नसून पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल वाढवण्याचे महत्त्वाचे साधन आहेत. विहिरी आणि तलावांचे पुनरुज्जीवन केल्यास भूजल पातळी वाढण्यास मदत होऊ शकते आणि उन्हाळ्यातही पाण्याची उपलब्धता टिकून राहू शकते. यंदा पाऊस लांबल्याने विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांवरील भिस्त वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जुन्या जलस्रोतांचे महत्त्व पुन्हा एकदा जाणवू लागले आहे. दिवसेंदिवस सरासरी पावसातील घट, वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे वेगाने होणारे बाष्पीभवन आणि बदलते हवामान याचा विचार करता प्रत्येक गावातील दुर्लक्षित जुन्या सार्वजनिक विहिरी आणि तलावांची स्वच्छता, गाळ काढणे, पावसाचे पाणी अडवणे आणि अतिक्रमण हटविण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. भविष्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीच तर आज दुर्लक्षित असलेल्या याच जुन्या विहिरी आणि तलाव गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी महत्त्वाचा आधार ठरू शकतात. त्यामुळे या पारंपारिक जलस्रोतांचे जतन करणे ही केवळ पर्यावरणाची गरज नसून गावाच्या भविष्यातील जलसुरक्षेची जबाबदारी आहे. ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन विहिरी व तलाव वाचवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आज जपलेली प्रत्येक विहीर आणि प्रत्येक तलाव उद्याच्या पिढीसाठी पाण्याचा भक्कम आधार ठरू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर येथे शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा!

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): करवंद नाका जनसंपर्क कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन; उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप येथील शिरपूर शिवसेना जनसंपर्क कार्यालय, करवंद नाका येथे शिवसेना...

‘एक घर – एक झाड’ उपक्रमांतर्गत हजारो रोपांचे मोफत वाटप

0
सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): शहरातील वाढते तापमान, प्रदूषण आणि पाणीटंचाईच्या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने ‘एक घर - एक झाड’ हा महत्त्वाकांक्षी पर्यावरणपूरक...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी धरणे आंदोलन.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे): दिनांक 19 जून 2026 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बस स्टॅन्ड चौक देऊळगाव राजा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी...

६० हजारांची स्प्लेंडर चोरणारा विधीसंघर्ष बालक ब्रम्हपुरी पोलिसांच्या जाळ्यात

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): ब्रह्मपुरी येथील नागेश्वर नगर भागातून चोरीला गेलेली दुचाकी अवघ्या काही दिवसांत शोधण्यात ब्रम्हपुरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी...

कोडीद येथे जागतिक सिकलसेल दिन उत्साहात साजरा शालेय रॅली व तपासणी शिबिराचे...

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) कोडीद, दि. 19 जून 2026: आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद अंतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळा कोडीद व जिल्हा परिषद शाळा चाकडू व...

error: Content is protected !!